घरमनोरंजनसॉरी चित्राजी! बॅकलेस फोटो टाकत उर्फी म्हणाली...

सॉरी चित्राजी! बॅकलेस फोटो टाकत उर्फी म्हणाली…

Subscribe

Urfir Javed | उर्फी अंगभर कपडे घालत नाही, म्हणून चित्रा वाघ यांनी तिच्यावर कारवाईची मागणी केली होती. त्यामुळे चित्रा वाघ यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी उर्फीने अंगभर कपडे घातले. पण एवढ्यावरच थांबेल तर ती उर्फी कसली.

Urfi Javed | मुंबई – प्रसिद्ध मॉडेल उर्फी जावेद आणि भाजपा नेत्या चित्रा वाघ यांच्यातील शीतयुद्ध अद्यापही सुरूच आहे. दोघीही एकमेकांवर सातत्याने टीका करत आहेत. त्यातच, उर्फीने चक्क चित्रा वाघ यांची माफी मागितली आहे. पण माफीवरच ती थांबली नाही. एक फोटो शेअर करत तिने चित्रा वाघ यांना उपरोधिक टोलाही लगावला आहे. नेमकं प्रकरण काय आहे ते वाचाच.

उर्फी तोकडे कपडे घालून सार्वजनिक ठिकाणी फिरते, त्यामुळे समाजस्वास्थ्य बिघडत असल्याचा आरोप भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी केला होता. आपल्याला विरोध होत असल्याने उर्फीनेही चित्रा वाघ यांना सोडलं नाही. त्यांची राजकीय प्रकरणे बाहेर काढत उर्फीने त्यांना छेडलं. संजय राठोडप्रकरणावरून उर्फीने चित्रा वाघ यांना टोला लगावला. त्यामुळे चित्रा वाघ यांना संताप अनावर झाला. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने उर्फीवर कारवाई करावी अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली. मात्र, महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी त्यांची ही मागणी फेटाळून लावली. बदल्यात चित्रा वाघ यांनाच नोटीस बजावली. उर्फीवरून सुरू झालेल्या या प्रकरणात आता राजकारण रंगलेलं असताना उर्फीने पुन्हा एक फोटो पोस्ट केलाय. यात तिने गुलाबी रंगाचा पूर्ण बाह्याचा ब्लाऊज आणि लेहेंगा परिधान केला आहे.

- Advertisement -

उर्फी अंगभर कपडे घालत नाही, म्हणून चित्रा वाघ यांनी तिच्यावर कारवाईची मागणी केली होती. त्यामुळे चित्रा वाघ यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी उर्फीने अंगभर कपडे घातले. पण एवढ्यावरच थांबेल तर ती उर्फी कसली. पूर्ण बाह्याचे कपडे, लेहेंगा असला तरीही ब्लाऊज तिचा बॅकलेस आहे. त्यामुळे आपल्या बॅकलेस असलेल्या गुलाबी रंगाच्या पेहरावाचा फोटो तिने ट्विटरवर अपलोड केला आहे. ‘लेकीन अभी बहोत सुधार बाकी है, सॉरी चित्रा वाघ जी. आय लव्ह यू’ म्हणत तिने चित्रा वाघांना खोचक टोला लगावला आहे.

चित्रा वाघ यांच्या इच्छेनुसार तिने सार्वजनिक ठिकाणी पूर्ण कपडे घातले असले तरीही ब्लाऊज मात्र बॅकलेस घातला आहे. त्यामुळे अजून खूप सुधारणा बाकी आहे, असं उर्फी म्हणते. अर्थात तिच्या या म्हणण्यामागे उपहास आहे हे नेटकऱ्यांना कळलं आहे. त्यामुळे नेटकऱ्यांनीही तिच्या या उपहासाला दिलखुलास प्रतिसाद दिला आहे.

- Advertisement -

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -