घरमहाराष्ट्रनाशिकजिल्हा मजूर संघात अध्यक्ष सकाळे की भोसले गटाचा?

जिल्हा मजूर संघात अध्यक्ष सकाळे की भोसले गटाचा?

Subscribe

नाशिक : जिल्ह्यातील ठेकेदारांच्या दृष्टीने प्रतिष्ठेचा विषय असलेल्या जिल्हा मजूर संघाच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत माजी अध्यक्ष संपतराव सकाळे व राजेंद्र भोसले यांच्या गटात चुरस निर्माण झाली आहे. अध्यक्ष निवडीसाठी एकच दिवस शिल्लक राहिल्याने रणनिती आखण्यास सुरुवात झाली आहे.

जिल्हा मजूर संघाच्या अध्यक्षांची निवड येत्या मंगळवारी (दि.10) होत आहे. गेल्या महिन्यात झालेल्या निवडणुकीत आठ जागा बिनविरोध झाल्यानंतर 12 जागांसाठी मतदान घेण्यात आले. यात येवला, सिन्नर, देवळा, नाशिक, सुरगाणा, पेठ व चांदवड या ठिकाणी अत्यंत चुरशीची लढाई झाली. तर ओबीसी, एससी, एसटी व महिलांच्या दोन जागांसाठीही मतदान घेण्यात आले. एकूण 20 जागांपैकी आठ तालुका संचालक बिनविरोध निवडून आलेले असल्यामुळे त्यांनी थेट अध्यक्ष, उपाध्यक्षपद मिळवण्याच्यादृष्टीने प्रयत्न सुरु केले आहेत.

- Advertisement -

संपतराव सकाळे यांचा एक गट तर मालेगावचे राजेंद्र भोसले यांचा दुसरा गट निर्माण झाला आहे. तसेच नांदगावचे आमदार सुहास कांदे, त्र्यंबकेश्वर-इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर व भाजपचे जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांची भूमिका देखील निर्णायक ठरु शकते. अध्यक्षाच्या निवडीसाठी एकच दिवसाचा अवधी राहिल्याने संचालकांना गळाला लावण्याचे प्रयत्न सुरु झाले आहेत. सोमवारी (दि.9) रात्री निर्णायक घडामोडी घडण्याची शक्यता असल्याने गाठीभेटींना सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील आमदारांनी देखील या निवडणुकीत लक्ष घातल्यामुळे कोण बाजी मारणार याकडे लक्ष लागून आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -