घरक्रीडाIND vs SL: विराटची पुन्हा शतकी खेळी, तेंडुलकरचा विक्रम मोडण्यापासून ४ शतकं दूर

IND vs SL: विराटची पुन्हा शतकी खेळी, तेंडुलकरचा विक्रम मोडण्यापासून ४ शतकं दूर

Subscribe

भारत आणि श्रीलंका यांच्यात वनडे सामन्यांच्या मालिकेला सुरूवात झाली आहे. दोन्ही संघात ३ सामन्यांची वनडे मालिका खेळवली जाणार आहे. पहिला सामना गुवाहाटीच्या बारसापारा स्टेडियममध्ये खेळवला जात आहे. यावेळी भारताचा माजी कर्णधार आणि रनमशीन विराट कोहलीने श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात ८० चेंडूत शतक पूर्ण केले. विराटचे वनडे क्रिकेटमधील हे ४५ वे शतक ठरले आहे. परंतु मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडण्यापासून विराट कोहली ४ शतकंच फक्त दूर आहे.

- Advertisement -

विराट कोहलीने झळकावलेल्या या शतकासोबत अनेक विक्रमांची नोंद झाली आहे. वनडेमधील श्रीलंकेविरुद्ध विराटचे हे ९वे शतक ठरले आहे. याआधी हा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर होता. विराटचे हे ७३ वे आंतराष्ट्रीय तर ४५ वे एकदिवसीय शतक ठरले आहे. विशेष म्हणजे या शतकासह वनडे सामन्यांच्या सर्वाधिक शतकांच्या यादीत विराट कोहली दुसऱ्या स्थानी पोहोचला आहे. तर या यादीत सचिन तेंडुलकरने ४९ शतक झळकावले असून तो प्रथम स्थानी आहे. तसेच ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉण्टिंगने ३० शतक झळकावले असून तो तिसऱ्या स्थानी आहे.

- Advertisement -

पहिल्या वनडेत श्रीलंकेने टॉस जिंकून भारताला फलंदाजीचे आमंत्रण दिले होते. श्रीलंकेला भारताने ३७४ धावांचं आव्हान दिलं आहे. मात्र, श्रीलंकेची सध्याची परिस्थिती पाहिली असता श्रीलंकेचे ८ गडी बाद झाले आहेत. तर ४८ षट्कांत २८१ धावा श्रीलंकेने आतापर्यंत केल्या आहेत. रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी शतकी भागिदारी करून संघाला दमदार सुरूवात करून दिली. ही जोडी बाद झाल्यानंतर विराटने सूत्रे हाती घेतली. विराटने संयमी फलंदाजी करत शतकं ठोकलं.


हेही वाचा : IND vs SL: वनडे मालिकेपूर्वी ‘या’ सरकारची मोठी घोषणा, क्रिकेटप्रेमींना दिलं अनोखं गिफ्ट


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -