घरदेश-विदेशनऊ न्यायाधीशांच्या नावावर कॉलेजियमचे शिक्कामोर्तब; मुंबईतून एका वकिलाची वर्णी

नऊ न्यायाधीशांच्या नावावर कॉलेजियमचे शिक्कामोर्तब; मुंबईतून एका वकिलाची वर्णी

Subscribe

उच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या निवडीसाठी मंगळवारी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचुड यांच्या अध्यक्षतेखालील कॉलेजिअमची बैठक झाली. या बैठकीत नऊ न्यायाधीशांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. विधि अधिकारी रामचंद्र हड्डर व व्यंकटेश नाईक थावरयानायक यांना पदोन्नती देत त्यांची न्यायाधीश म्हणून निवड करण्यात आली आहे.

नवी दिल्लीः देशाभरातील उच्च न्यायालयांतील नऊ न्यायाधीशांच्या निवडीवर सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने मंगळवारी शिक्कामोर्तब केले. यामध्ये दोन वकीलांची वर्णी लागली आहे. त्यातील एक वकील या मुंबई उच्च न्यायालयातील आहेत. adv निला केदारे असे त्यांचे नाव आहे.

उच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या निवडीसाठी मंगळवारी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचुड यांच्या अध्यक्षतेखालील कॉलेजियमची बैठक झाली. या बैठकीत नऊ न्यायाधीशांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. विधि अधिकारी रामचंद्र हड्डर व व्यंकटेश नाईक थावरयानायक यांना पदोन्नती देत त्यांची न्यायाधीश म्हणून निवड करण्यात आली आहे.

- Advertisement -

कर्नाटक उच्च न्यायालयात नागेंद्र रामचंद्र नाईक यांची न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्याचा निर्णय आधी घेण्यात आला होता. हा निर्णय कायम ठेवण्यावर कॉलेजियमचे एकमत झाले आहे. तसेच मुंबई उच्च न्यायालयातील adv निला केदारे यांची न्यायाधीशपदी वर्णी लागली आहे. गुवाहटी उच्च न्यायालयात विधि अधिकारी मृदुल कुमार कलिता यांना न्यायाधीश म्हणून पदोन्नती देण्यात आली आहे. आंध्र प्रदेश उच्च न्यायालयात विधि अधिकारी पी. व्यंकट ज्योतिर्मय व गोपाळकृष्ण राव यांची न्यायाधीशपदी वर्णी लागली आहे. मणिपूर उच्च न्यायालयात अरिबम गुणेश्वर व गोलमई काबुई यांचीही न्यायाधीश म्हणून शिफारस झाली आहे.

न्यायाधीश निवड प्रक्रियेवरून न्यायालय व केंद्र सरकारमधील वाद सुरु होता. केंद्र सरकारने एक पाऊल मागे घेत न्यायाधीश निवडीच्या कॉलेजियम पद्धतीनुसार लवकरच न्यायाधीशांची निवड केली जाईल, असे सर्वोच्च न्यायालयाला गेल्या आठवड्यात सांगितले.
न्या. संजय कौल व न्या. अभय ओक यांच्या खंडपीठाला Attorney General आर. वेंकटरमानी यांनी ही माहिती दिली. न्यायाधीश निवडीसाठी सर्वोच्च न्यायालायने दिलेल्या कालमर्यादेचे पालन केले जाईल. देशभरातील उच्च न्यायालयांनी न्यायाधीश पदासाठी १०४ नावे दिली आहेत. त्यातील ४४ नावे अंतिम करून उद्याच सर्वोच्च न्यायालयाकडे पाठवली जातील. उर्वरित नावांवर लवकरच निर्णय घेतला जाईल. मी स्वतः या प्रक्रियेत लक्ष देईन, असे Attorney General आर. वेंकटरमानी यांनी न्यायालयाला सांगितले. त्यामुळे आता कॉलेजियमने निवड केलेल्या न्यायाधीशांच्या नियुक्तीचाही मार्ग मोकळा झाला आहे.

- Advertisement -

 

 

 

Amar Mohite
Amar Mohitehttps://www.mymahanagar.com/author/amar-mohite/
गेली १७ वर्षे पत्रकारितेत कार्यरत, न्यायालयीन निकाल आणि सुनावणीवर लिहिण्याची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -