घरदेश-विदेशपंतप्रधान नरेंद्र मोदींना झोपू देणार नाही - राहुल गांधी

पंतप्रधान नरेंद्र मोदींना झोपू देणार नाही – राहुल गांधी

Subscribe

जोवर देशभरातील शेतकऱ्याचं कर्ज माफ होत नाही. तोवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना झोपू देणार नाही असा इशारा काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी दिला आहे.

शेतकरी कर्जमाफीवरून काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. जोवर देशभरातील शेतकऱ्याचं कर्ज माफ होत नाही. तोवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना झोपू देणार नाही असा इशारा काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी दिला आहे. दरम्यान, राहुल गांधी यांनी यावेळी संसदेतून शेतकऱ्यांशी संवाद साधला. शेतकऱ्यांच्या कर्जाचा प्रश्न गंभीर होताना दिसत आहे. त्यासाठी शेतकरी रस्त्यावर देखील उतरला आहे. या साऱ्या स्थितीमध्ये जोवर पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकऱ्याचं कर्ज माफ करत नाही तोवर पंतप्रधान नरेंद्र शांतपणे झोपू देणार नाही अशा शब्दात राहुल गांधी यांनी पंतप्रधानांना लक्ष्य केलं आहे. देशातील उद्योगपतींचं साडेतीन लाख कोटींचे कर्ज माफ केलं. मग शेतकऱ्याचं कर्ज का माफ होऊ शकत नाही? असा सवाल यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. यावेळी राहुल गांधी यांनी राजस्थान आणि मध्य प्रदेशातील काँग्रेसनं केलेल्या कर्जमाफीचं देखील उदाहरण दिलं.

मध्य प्रदेश, राजस्थानमध्ये कर्जमाफी

सत्तेत आल्यास शेतकऱ्याचं कर्ज माफ केले जाईल असं आश्वासन काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी पाच राज्यातील प्रचारादरम्यानं दिलं होतं. अखेर सत्तेवर येताच काँग्रेसनं मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये शेतकऱ्याचं कर्जमाफ केलं. त्यावरून देखील राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना खडे बोल सुनावले आहेत.

- Advertisement -

नोटाबंदीवरून लक्ष्य

यावेळ बोलताना राहुल गांधी नोटाबंदीवरून देखील सरकारला लक्ष्य केलं आहे. नोटाबंदी हा देशाला मिळालेला सर्वात मोठा शाप आहे. नोटाबंदीच्या नावाखाली देशातील लोकांचे पेसै चोरीला गेले अशी टिका देखील यावेळी राहुल गांधी यांनी केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -