घरमहाराष्ट्रसबके अच्छे दिन आए? मोदींचा व्हिडीओ शेअर करत सचिन सावंतांचा सवाल

सबके अच्छे दिन आए? मोदींचा व्हिडीओ शेअर करत सचिन सावंतांचा सवाल

Subscribe

Sachin Sawant taunt to Narendra Modi | काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी मोदींवर टीकास्त्र डागलं आहे. सबके अच्छे दिन आए? असा सवाल उपस्थित करत त्यांनी मोदींवर टीका केली.

मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटकातील विविध विकासकामांचे काल उद्घाटन केले. या सर्व विकासप्रकल्पांसाठी कर्नाटकातील यादगीरच्या सर्व जनतेचं खूप खूप अभिनंदन, असं मोदी काल कर्नाटकात म्हणाले. यावरून काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी मोदींवर टीकास्त्र डागलं आहे. सबके अच्छे दिन आए? असा सवाल उपस्थित करत त्यांनी मोदींवर टीका केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी काल कर्नाटकच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यादरम्यान त्यांनी विविध विकासकामांचं उद्घाटन केलं. यावेळी त्यांनी जनतेला संबोधितही केले. “नारायणपूर धरणाच्या डाव्या किनारी कालव्याचा विस्तार आणि आधुनिकीकरणामुळे, यादगीर, कलबुर्गी आणि विजयपूर जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांना थेट लाभ होणार आहे. यादगीर ग्राम बहुपाणीपुरवठा योजनेतून जिल्ह्यातील लाखो कुटुंबांना पिण्याचं शुद्ध पाणी उपलब्ध होणार आहे.सुरत-चेन्नई इकॉनॉमिक कॉरिडॉरच्या कर्नाटकमध्ये येत असलेल्या पट्ट्यावरसुद्धा आज काम सुरू झालं आहे. यामुळे यादगीर, रायचूर आणि कलबुर्गीसह या संपूर्ण प्रदेशात लोकांचं जीवन सुलभ आणि सुकर होईल आणि येथील उद्योग तसंच रोजगारालाही मोठी चालना मिळेल. या सर्व विकासप्रकल्पांसाठी कर्नाटकातील यादगीरच्या सर्व जनतेचं खूप खूप अभिनंदन! मी बोम्मई जी आणि त्यांच्या संपूर्ण चमूचेही खूप अभिनंदन करतो. उत्तर कर्नाटकच्या विकासासाठी ज्या वेगानं काम होत आहे ते कौतुकास्पद आहे,” असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा – दावोसमधून मोठी गुंतवणूक आणल्याची शिंदे सरकारची ‘बनवाबनवी’ उघड; काँग्रेसचं टीकास्त्र

मोदींच्या या विकासकामांच्या भाषणांवरून सचिन सावंत यांनी टीका केली आहे. अमृत काल और भविष्य की बात बाद में करेंगे! २०२२ के वादों का क्या हुआ वो बताईए।, किसानों की आमदनी दुगनी हुई?, सबको घर मिलें?, दो करोड रोजगार प्रतिवर्ष दिए?, १०० शहर स्मार्ट सिटी में परिवर्तित हुए?, बाकी छोड़ दो….. , सबके अच्छे दिन आए?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

- Advertisement -

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -