घरक्रीडाU19 Womens T20 World Cup : श्रीलंकेचा पराभव करत भारतीय संघाचा दमदार...

U19 Womens T20 World Cup : श्रीलंकेचा पराभव करत भारतीय संघाचा दमदार विजय

Subscribe

महिला अंडर-19 विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाने मोठा विजय मिळवला आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यात झालेल्या सामन्यात भारतीय संघाने श्रीलंकेचा 7 गडी राखून पराभव केला.

महिला अंडर-19 विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाने मोठा विजय मिळवला आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यात झालेल्या सामन्यात भारतीय संघाने श्रीलंकेचा 7 गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेचा संघ 20 षटकांत केवळ 59 धावाच करू शकला. भारतीय महिला संघाने 8 षटकांत 3 गडी गमावून लक्ष्य गाठले. या विजयासह संघ उपांत्य फेरी गाठण्याच्या शर्यतीत कायम आहे. (U19 Womens T20 World Cup India Semi Final Equation Soumya Tiwari Seven Wicket Sri Lanka Team)

प्रथम गोलंदाजी करताना भारतीय महिला संघासाठी गोलंदाजांनी दमदार कामगिरी केली. सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर श्रीलंकेला पहिला धक्का बसला. त्यानंतर श्रीलंकेच्या संघाला धावसंख्या उभारता आली नाही. 20 षटकात श्रीलंकेच्या संघाने 9 गडी गमावून 59 धावाच केल्या.

- Advertisement -

या सामन्यात श्रीलंकेच्या संघाकडून कर्णधार विश्मी गुणरत्नेने सर्वाधिक 25 धावा केल्या. 5व्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या उमय रत्नायकेने 36 चेंडूत 13 धावा केल्या. या दोघांशिवाय एकाही फलंदाजाला 10 चा आकडा गाठता आला नाही. भारताकडून पार्श्वी चोप्राने 4 षटकात 5 धावा देत 4 विकेट घेतल्या तर मन्नत कश्यपने 2 घेतल्या.

श्रीलंकेने दिलेल्या 59 धावांचा पाठलाग करताना भारतीय कर्णधार शफाली वर्मा हिने एक षटकार आणि एक चौकार मारत 10 चेंडूत 15 धावा केल्या आणि बाद झाली. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेली रिचा घोषही चांगली कामगिरी करू शकली नाही. पहिल्या चेंडूवर चौकार मारल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर बाद झाली. चौथ्या क्रमांकावर खेळण्यासाठी आलेल्या सौम्या तिवारीने धडाकेबाज खेळी केली. सौम्याने 15 चेंडूत नाबाद 28 धावा केल्या. या खेळीत 5 चौकारांचा समावेश होता. त्याने संघाला 7.2 षटकांत लक्ष्य गाठले.

- Advertisement -

हेही वाचा –पाकिस्तानच्या रमीझ राजा यांनी ‘या’ भारतीय फलंदाजाचे केले कौतुक; म्हणाले, ‘तो मिनी रोहित शर्मा आहे’

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -