घरताज्या घडामोडीबाळासाहेब ठाकरेंचा वाढदिवस हा शिवसैनिकांसाठी आनंदाचा दिवस असतो - मुख्यमंत्री शिंदे

बाळासाहेब ठाकरेंचा वाढदिवस हा शिवसैनिकांसाठी आनंदाचा दिवस असतो – मुख्यमंत्री शिंदे

Subscribe

'हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा वाढदिवस हा शिवसैनिकांसाठी आनंदाचा दिवस असतो. बाळासाहेब ठाकरे यांच्या व्यक्तिमत्वाची संपूर्ण जगभरात नोंद घेतली जाते. तसेच बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळेच शिवसेनेच्या छोट्या कार्यकर्त्यांनी मोठ्या जबाबदाऱ्या स्विकारल्या आहेत', असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा वाढदिवस हा शिवसैनिकांसाठी आनंदाचा दिवस असतो. बाळासाहेब ठाकरे यांच्या व्यक्तिमत्वाची संपूर्ण जगभरात नोंद घेतली जाते. तसेच बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळेच शिवसेनेच्या छोट्या कार्यकर्त्यांनी मोठ्या जबाबदाऱ्या स्विकारल्या आहेत’, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती आहे. त्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. (Balasaheb Thackeray Birthday is a day of joy for Shiv Sena Workers Says CM Eknath Shinde)

प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, “हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा वाढदिवस हा शिवसैनिकांसाठी आनंदाचा दिवस असतो. बाळासाहेबांचा वाढदिवस नेहमी उत्साहत साजरा करत आलो. आजही बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मोठ्या प्रमाणात सामाजिक उपक्रम राबवण्यात येत आहेत. अनेक आरोग्य शिबिरे भरवण्यात आली आहेत. आज विधान भवनाच्या मध्यवर्ती सभागृहात बाळासाहेब ठाकरे यांचे तैलचित्र आम्ही लावणार आहोत. बाळासाहेबांच्या तैलचित्राबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी घेतलेल्या निर्णयाबद्दल मी त्यांचा आभारी आहे”.

- Advertisement -

“बाळासाहेब ठाकरे यांच्या व्यक्तिमत्वाची संपूर्ण जगभरात नोंद घेतली जाते. तसेच बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळेच शिवसेनेच्या छोट्या कार्यकर्त्यांनी मोठ्या जबाबदाऱ्या स्विकारल्या आहेत. माझ्यासारखा एक सर्वसामान्य कार्यकर्ता त्यांच्याच विचाराने प्रभावित झालाय. तसेच, मला राज्याचा मुख्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली. असा एकही दिवस किंवा क्षण नाही की जेव्हा बाळासाहेबांची आठवण होत नाही”, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

त्याशिवाय, “सर्वसामान्यांना न्याय देणे ही बाळासाहेब ठाकरे यांची शिकवण आहे. ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण हा त्यांचा मूलमंत्र आहे. बाळासाहेबांचा हाच विचार डोळ्यासमोर ठेवून आम्ही काम करत आहोत. बाळासाहेबांच्या विचारांवर चालणारे हे सरकार आहे. सर्वसामान्यांच्या न्यायहक्कासाठी आमचे सरकार आहे. त्यामुळे कमी कालावधीत आम्ही अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत”, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

- Advertisement -

हेही वाचा – Breaking : पाकिस्तानात वीजपुरवठा खंडित, राजधानीसह अनेक जिल्हे अंधारात

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -