घरताज्या घडामोडीसरकारने एसटीचे ६०० कोटी थकवले; काँग्रेसचा आरोप

सरकारने एसटीचे ६०० कोटी थकवले; काँग्रेसचा आरोप

Subscribe

राज्यातील ज्येष्ठ नागरिकांपासून, स्वातंत्र्यसैनिक, विद्यार्थी, रुग्ण अशा विविध घटकांना एसटीच्या प्रवासी भाड्यात सवलतीपासून मोफत प्रवासाची सुविधा राज्य सरकारने दिली आहे. याची प्रतिपूर्ती राज्य सरकारच्या वतीने एसटी महामंडळाला केली जाते.

मुंबई : राज्यातील ज्येष्ठ नागरिकांपासून, स्वातंत्र्यसैनिक, विद्यार्थी, रुग्ण अशा विविध घटकांना एसटीच्या प्रवासी भाड्यात सवलतीपासून मोफत प्रवासाची सुविधा राज्य सरकारने दिली आहे. याची प्रतिपूर्ती राज्य सरकारच्या वतीने एसटी महामंडळाला केली जाते. मात्र राज्य सरकारने आतापर्यंत एसटीची तब्बल ६०० कोटी रुपयांची प्रतिपूर्तीची रक्कम थकवली असल्याची माहिती समोर आली आहे. (600 crore owed by the government to STs; Allegations of Congress)

एसटी प्रवासात विविध समाज घटकातील नागरिकांना प्रवास भाड्यात सवलत दिली जाते. यात मुख्यत्वे स्वातंत्र्य सैनिक आणि त्यांचा सहप्रवासी, ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक, ५ वी ते १० वी पर्यंत शिक्षण घेणारे ग्रामीण भागातील विद्यार्थी, अपंग, गुणवंत कामगार पुरस्कार विजेते, सिकल सेल, डायलेसिस रुग्ण अशा काहींना संपूर्ण मोफत प्रवास तर काहीना प्रवासी भाड्यात पन्नास टक्के सवलत दिली जाते. एकूण एसटी बस मध्ये २९ प्रकारच्या सवलती दिल्या जात असून त्याची प्रतीपूर्तीची रक्कम सरकार वर्षानुवर्षे करीत आहे.

- Advertisement -

मात्र, गेल्या काही महिन्यांपासून ही रक्कम थकली असून २०२१ -२०२२ या वर्षतील एकूण ३८९ कोटी रुपये येणे बाकी आहे. आत्ता पर्यंतची एकूण अंदाजे ६०० कोटी रुपयांची रक्कम सरकारकडे थकीत आहे. ही रक्कम देण्यासाठी सरकार टाळाटाळ करीत असून एसटी सक्षम करण्याच्या पोकळ घोषणा करीत असल्याचा आरोप महाराष्ट्र एस.टी.कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केला आहे.

एसटी प्रवास सवलतीच्या संपूर्ण रक्कमेची प्रतिपूर्ती सरकार करीत असून साधारणतः वर्षाला १ हजार ६०० कोटी रुपये इतकी रक्कम सरकार महामंडळाला अनेक वर्षे देत आहे.पण सरकारने गेले काही महिने यातील एकही पैसा दिला नसून एसटी सक्षमीकरणाच्या निव्वळ गप्पा मारल्या जात आहेत, अशी टीका बरगे यांनी केली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – राष्ट्रपती भवनातील मुघल गार्डन आता ‘अमृत उद्यान’, मंगळवारपासून होणार सर्वांसाठी खुले

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -