घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रनाशिक पदवीधर प्रचाराच्या तोफा थंडावल्या; काय-काय घडले, वाचा संपूर्ण घटनाक्रम

नाशिक पदवीधर प्रचाराच्या तोफा थंडावल्या; काय-काय घडले, वाचा संपूर्ण घटनाक्रम

Subscribe

नाशिक : नाशिक पदवीधर मतदार संघाची निवडणूक खर्‍या अर्थाने यावेळी खूपच रंजक ठरली. पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीचे अर्ज दाखल करण्यापूर्वीच या निवडणुकीमध्ये अनेक राजकीय घडामोडी सुरू घडण्यास सुरुवात झाली होती. अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी खरंतर अनेक उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले. पण त्याच्या दोन दिवस आधीच युवक काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे भाजपमध्ये प्रवेश करतील की काय अशी शक्यता वर्तवण्यात आलेली होती. मात्र, त्यांचे वडील आणि या मतदारसंघाचे मागील तीन वेळेस आमदार राहिलेले डॉ. सुधीर तांबे यांना काँग्रेस पक्षाने अधिकृत उमेदवारी दिली. उमेदवारी अर्ज दाखल करण्याला काही क्षण बाकी असताना तांबे पिता-पुत्र नाशिक विभागीय कार्यालयामध्ये आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आले. मात्र, त्या ठिकाणी मोठी घडामोड घडली अधिकृत उमेदवारी प्राप्त असलेले सुधीर तांबे यांनी उमेदवारी दाखल न करता त्यांचे पुत्र सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली.  या घडामोडी मुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एकच खळबळ उडाली. यानंतर पत्रकारांशी संवाद साधत असताना सत्यजित तांबे यांनी इतर सर्वच पक्षांसोबत भारतीय जनता पार्टीकडे देखील पाठिंबा मागणार असल्याचं आणि मी अपक्ष उमेदवार म्हणून या निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचं म्हटल्यानंतर तांबे यांच्या बंडा मागे भाजपचीच रणनीती आहे का अशा चर्चा घडून आल्या.

खरंतर या निवडणुकीमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी ठरली ती होती राज्यातील आणि देशातील सगळ्यात मोठा पक्ष असलेल्या भारतीय जनता पार्टीने नाशिक पदवीधर साठी आपला उमेदवारच दिला नाही. नेमका त्यांनी उमेदवार का दिला नाही याचं सस्पेन्स प्रचाराच्या अखेरच्या दिवसापर्यंत कायम राहिल. सत्यजित तांबे यांनी म्हटल्याप्रमाणे भारतीय जनता पार्टी सत्यजित तांबे यांना पाठिंबा देईल अशी शक्यता वर्तवण्यात आलेली होती. मात्र, काही दिवसानंतर प्रचार जसा पुढे जात गेला तसा तांबे पिता पुत्रांनी आम्ही अपक्ष उमेदवार आहोत, तर कधी आम्ही काँग्रेसचेच आहोत, तर आम्ही कोणाकडेच पाठिंबा मागणार नाही, आम्ही अराजकीय पद्धतीने पुढे जाऊ अशा पद्धतीचे विविध विधान केली. तर, दुसरीकडून भारतीय जनता पार्टी कडून देखील कुठल्याही प्रकारे सत्यजित तांबे यांना पाठिंबा देण्यासाठी उत्साह दाखवण्यात आला नाही.

- Advertisement -

तर, दुसरीकडे भारतीय जनता पार्टी कडून देखील या निवडणुकीसाठी तीन उमेदवारांनी तिकीट मागितले होते. त्यामध्ये अहमदनगरचे जाधव, धुळ्याचे विसपुते, तर शुभांगी पाटील यांनी देखील भारतीय जनता पार्टीकडे उमेदवारी मागितलेली होती. मात्र, उमेदवारी न मिळाल्यामुळे शुभांगी पाटील यांनी थेट मातोश्री गाठत उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठिंब्याची मागणी केली. त्यानंतर महाविकास आघाडीमध्ये अनेक घडामोडी घडल्या, अनेक बैठका झाल्या आणि त्या बैठकांमध्ये नागपूरची जागा ही काँग्रेसला आणि नाशिकची जागा ही शिवसेनेला देण्याचं ठरलं. त्यानंतर खर्‍या अर्थाने शुभांगी पाटील यांना महाविकास आघाडीच्या उमेदवार म्हणून पुरस्कृत करण्यात आलं.

अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी भारतीय जनता पार्टीचे संकटमोचक म्हणून ओळखले जाणारे आणि उत्तर महाराष्ट्रातील महतवचे नेते गिरीश महाजन यांनी नाशिक मध्ये तळ ठोकत जाधव आणि विसपुते ह्या दोन उमेदवारांना अर्ज माघारी घेण्यास सांगितले. शुभांगी पाटील यांना देखील अर्ज माघारी घेण्यास भाग पाडले जाऊ शकते देखील अशी शक्यता वर्तवण्यात आलेली होती. मात्र, शुभांगी पाटील या आदल्या दिवशी रात्रीपासूनच नॉट रिचेबल होत्या. त्या थेट जोपर्यंत अर्ज माघारी घेण्याचा वेळ संपत नाही तोपर्यंत त्या नॉट रिचेबल राहिल्या. अर्ज माघारी घेण्याची वेळ संपताच त्या माध्यमांच्या समोर आल्या आणि मी महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढणारच आणि उद्धव ठाकरे यांना दिलेला शब्द पूर्ण करणारच अशा पद्धतीचा विधान करत त्यांनी ह्या निवडणुकीमध्ये खर्‍या अर्थाने रंगत आणली. खर्‍या अर्थाने ही निवडणूक आता तांबे पिता-पुत्र विरुद्ध महाविकास आघाडी अर्थात शुभांगी पाटील अशी दुरंगी होणार हे निश्चित झालं

- Advertisement -

जस जशा प्रचाराच्या तोफा धडकत होत्या तसतसं दररोज या निवडणुकीमध्ये नवनवीन घडामोडी घडत होत्या या माध्यमातून सत्यजित तांबे यांना विविध संघटना जसे टीडीएफसह शिक्षक व पदवीधर यांच्या अनेक संघटनांनी पाठिंबा दर्शवला. तर दुसर्‍या बाजूला महाविकास आघाडी ही एक संघ आहे असं दाखवण्यासाठी शिवसेनेचे वरिष्ठ नेते असतील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले असतील किंवा मग छगन भुजबळ यांनी स्वतः मैदानात उतरत आपल्या कार्यकर्त्यांना आवाहन केलं सर्व महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी एकजुटीने शुभांगी पाटील यांचा प्रचार करायचा व त्यांना निवडून आणण्यासाठी ताकद लावण्याचा आव्हान यांनी केल्याचे दिसून आलं. त्यामुळे ही निवडणूक अधिकच रंजक होत गेली.

या निवडणुकीमध्ये खरं बघायला गेलं तर ज्यावेळी तांबे पिता पुत्रांनी बंड केलं. त्यानंतर सत्यजित तांबे यांचे मामा आणि या मतदारसंघाचे विद्यमान आमदार सुधीर तांबे यांचे मेहुणे, काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्रातील मोठे नेतृत्व बाळासाहेब थोरात यांच्या अडचणी वाढलेल्या होत्या बाळासाहेब थोरात ज्या दिवशी या पिता पुत्रांनी बंड केल त्या दिवशी त्यांची शस्त्रक्रिया झाल्यामुळे ते रुग्णालयामध्ये ऍडमिट होते. त्यामुळे त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नव्हती, त्यानंतर देखील त्यांची भूमिका प्रचाराच्या तोफा संपण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत गुलदस्त्यात राहिली. याचमुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना देखील उधाण आल्याचं दिसून आलं.

खरंतर ही निवडणूक दुरंगी होणार असं दिसत असतानाच अचानकपणे स्वराज्य संघटनेचे उमेदवार सुरेश पवार यांनी सुद्धा प्रचारामध्ये आघाडी घेतली. स्वराज्य संघटनेचे प्रमुख युवराज संभाजी राजे छत्रपती यांनी त्यांना पाठिंबा दर्शवला स्वराज्य संघटनेच्या पाचही जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी त्यांच्या प्रचारासाठी मेहनत घेतली. याच दरम्यान मध्ये सुरेश पवार यांनी सत्यजित तांबे यांना थेट औरंगजेबाची उपमा देत एक मोठी खळबळ माजवली. तर, स्वतः संभाजी राजे यांनी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी स्वराज्य संघटनेच्या मेळावा व पद नियुक्ती सोहळ्यामध्ये सुरेश पवार हे येत्या निवडणुकीमध्ये ‘डार्क हॉर्स’ ठरतील आणि त्यांचा विजय निश्चित आहे. असा विश्वास व्यक्त केला त्यामुळे ही निवडणूक दुरंगी होणार की तिरंगी होणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागलेलं आहे.

खरंतर महाराष्ट्रामध्ये पाच ठिकाणी विधान परिषदेसाठी निवडणुका होत आहेत मात्र नाशिक विधान परिषदेची निवडणूक ही महत्त्वपूर्ण ठरलेली आहे ती या ठिकाणी घडलेल्या अनेक घडामोडी आणि रोजच घडत असलेल्या ट्विस्टमुळे ही जास्ती रंजक आणि महत्त्वपूर्ण ठरल्याचा दिसून आलं संपूर्ण राज्यातच नव्हे तर देशाचे लक्ष या निवडणुकीकडे लागून आहे आता 30 तारखेला म्हणजे सोमवारी या मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मतदान पार पाडतो आहे आणि दोन तारखेला याचा निकाल आहे नेमका मतदानाच्या दिवशी हे पदवीधर मतदार कोणाच्या बाजूने कौल देतात आणि दोन तारखेला कुठला निकाल आपल्या समोर येतो हे बघणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -