घरक्राइमइन्स्टाग्रामवरील मैत्री महिलेच्या अंगलट; अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची मिळाली धमकी

इन्स्टाग्रामवरील मैत्री महिलेच्या अंगलट; अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची मिळाली धमकी

Subscribe

सन्नी चौहान उर्फ राघव चौहान असे आरोपीचे नाव आहे. त्याच्या विरोधात एका विवाहित महिलेने तक्रार केली होती. त्या तक्रारीच्याआधारे पोलिसांनी चौहानला अटक केली. चौहान इंदौर येथील रहिवासी आहे. महिलेसोबत गेल्या वर्षी इंस्टाग्रामवर त्याने मैत्री केली. हळूहळू दोघांमध्ये मैत्री वाढली. आरोपी तिला नेहमी मेसेज करायचा. दोघांमध्ये व्हिडिओ कॉल सुरु झाले. व्हिडिओ कॉल सुरु असताना महिलेने त्याच्या समोर कपडे काढले. चौहानने त्याचे चित्रिकरण केले. 

 

नवी दिल्लीः इंस्टाग्रामवर मैत्री करणे एका विवाहित महिलेच्या अंगलट आले आहे. अश्लील व्हिडिओ काढून ते सोशल मिडियावर व्हायरल करण्याची धमकीच महिलेला मिळाली. अखेर पोलिसांनी आरोपीला मध्य प्रदेश येथून अटक केली आहे.

- Advertisement -

सन्नी चौहान उर्फ राघव चौहान असे आरोपीचे नाव आहे. त्याच्या विरोधात एका विवाहित महिलेने तक्रार केली होती. त्या तक्रारीच्याआधारे पोलिसांनी चौहानला अटक केली. चौहान इंदौर येथील रहिवासी आहे. महिलेसोबत गेल्या वर्षी इंस्टाग्रामवर त्याने मैत्री केली. हळूहळू दोघांमध्ये मैत्री वाढली. आरोपी तिला नेहमी मेसेज करायचा. दोघांमध्ये व्हिडिओ कॉल सुरु झाले. व्हिडिओ कॉलचे प्रमाणही वाढले. एकदा व्हिडिओ कॉल सुरु असताना महिलेने त्याच्या समोर कपडे काढले. चौहानने त्याचे चित्रिकरण केले.

त्यानंतर हे अश्लील चित्रिकरण व्हायरल करण्याची धमकी आरोपीने महिलेला दिली. महिलेकडे पैशांची मागणी केली. महिलेने घाबरून आरोपीला १ लाख २५ हजार रुपये दिले. त्यानंतर तो वारंवार पैशांची मागणी करु लागला. महिलेने पैसे देण्यास नकार दिला. मग त्याने महिलेचा अश्लील व्हिडिओ तिच्या पतीला पाठवला. हा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी चौहानने पतीलाही दिली. पतीकडे ७० हजार रुपायांची मागणी केली. त्यानंंतर पीडित महिलेने चौहान विरोधात पोलिसांत तक्रार केली. पोलिसांनी कारवाई करत चौहानला अटक केली.

- Advertisement -

याबाबत अधिक माहिती देताना डीसीपी श्वेता चौहान यांनी सांगितले की, पीडित महिलेच्या तक्रारीवरुन आम्ही चौहानला करोल बाग येथून अटक केली आहे. पीडित महिलेचा व्हिडिओ बनवण्यासाठी वापरण्यात आलेला मोबाइल फोन व गुन्ह्यासाठी वापरलेले तीन सिमकार्ड जप्त करण्यात आले आहेत. चौहान रेल्वेत नोकरीला आहे. त्याने गुन्हा कबुल केला आहे. सोशल मिडियावर त्याची अनेक खाती आहेत.  सोशल मिडियाच्या माध्यमातून तो महिलांशी संपर्क साधायचा.चौहानने अजून किती महिलांची फसवणूक केली आहे. गुन्ह्यात त्याला कोणाची मदत होती का?, याचा तपास पोलीस करत आहेत.

Amar Mohite
Amar Mohitehttps://www.mymahanagar.com/author/amar-mohite/
गेली १७ वर्षे पत्रकारितेत कार्यरत, न्यायालयीन निकाल आणि सुनावणीवर लिहिण्याची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -