घरपालघरमोकाट कुत्र्यांच्या गणनेबाबत पालिका निद्रावस्थेत

मोकाट कुत्र्यांच्या गणनेबाबत पालिका निद्रावस्थेत

Subscribe

पडताळणीऐवजी ठेकेदाराने सादर केलेल्या छायाचित्रांचा आधार घेत श्वान निर्बिजीकरण व लसीकरण होत असल्याचे छातीठोक सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे.

वसईः वसई-विरार महापालिकेने कुत्र्यांची गणना केलेली नाही. प्राणी प्रेमींच्या अंदाजानुसार वसई-विरार शहरात ५० हजारपेक्षा जास्त कुत्रे आहेत, असा अजब खुलासा वसई-विरार महापालिकेने केला आहे. हा खुलासा करताना महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने प्रत्यक्ष निरीक्षण व पडताळणीऐवजी ठेकेदाराने सादर केलेल्या छायाचित्रांचा आधार घेत श्वान निर्बिजीकरण व लसीकरण होत असल्याचे छातीठोक सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे.

महापालिकेच्या घनकचरा विभागाकडून करण्यात येत असलेल्या श्वानांच्या निर्बिजीकरण व रॅबिज लसीकरण आकडेवारीतील फुगवटा, त्यात घातलेला घोळ, संशयास्पद व महापालिकेच्या दफ्तरी सापडत नसलेली माहिती, अटी-शर्थींचे होत असलेले उल्लंघन पाहता प्रथमदर्शनी यात घोटाळा झाला असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आलेली होती. या संदर्भातील वाढत्या तक्रारींनंतर महापालिका आयुक्त अनिलकुमार पवार यांनी घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या उपायुक्त चारुशिला पंडित यांना या कामाच्या चौकशीचे आदेश देऊन पंधरा दिवसांच्या आत अहवाल सादर करण्यास कळवले होते. याशिवाय हे प्रकरण आढावा बैठकीतही चर्चेला घेण्याचे आश्वासित केले होते. उपायुक्त चारुशिला पंडित यांनी अनेकदा टाळाटाळ केल्यानंतर तब्बल साडेतीन महिन्यांच्या कालावधीनंतर अखेर या कामाबाबत खुलासा केला आहे. श्वानांच्या निर्बिजीकरण व रेबिज लसणीकरण कामाबाबत १२ मुद्दे उपस्थित करण्यात आले होते. या मुद्द्यांवर खुलासा करताना कुत्र्यांची गणना महापालिकेने केलेली नसल्याचे म्हटले आहे. किंबहुना प्राणीप्रेमींच्या अंदाजावरच आपली भिस्त असल्याचे अप्रत्यक्षरीत्या सांगण्याचा प्रयत्न या खुलाशातून केलेला आहे. मात्र हा खुलासा करताना प्राणी प्रेमी कोणत्या आधारे हा अंदाज वर्तवतात आणि त्यांचा अंदाज घेण्याचे कारण काय? याचा उल्लेख कुठेही केलेला नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -