घरपालघरदुर्दैव ! एवढ्या जवळच्या व्यक्तीने दिली हत्येची सुपारी

दुर्दैव ! एवढ्या जवळच्या व्यक्तीने दिली हत्येची सुपारी

Subscribe

त्यानंतर बिलाल आणि सौफिया यांनी वसई जवळील नायगाव परिसरात नेवून दोघांनी धारदार शस्त्राने कामरुद्दीनची हत्या केली व झाडी झुडपात त्याचा मृतदेह फेकून दिला होता.

वसई: वसई जवळील नायगाव परिसरात पोलिसांना सापडलेल्या अद्यात इसमाच्या मृतदेहाचा अखेर उलगडा झाला आहे. मुंबईच्या गोरेगाव परिसरात राहणार्‍या पत्नीने आपल्याच पतीची 1 लाख रुपयांची सुपारी देऊन हत्या घडवल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. कमरुद्दीन उस्मान अन्सारी असे मयत पतीचे नाव असून अशिया अन्सारी असे आरोपी पत्नीचे नाव आहे.गोरेगाव पूर्वेच्या भगत सिंग चाळीत हे दाम्पत्य राहत होते. पत्नी अशिया हिने तिच्या शेजारी राहणारे बिलाल पठाण आणि त्याची पत्नी सौफिया पठाण यांना कमरुद्दीनला ठार मारण्यासाठी 1 लाख रुपयांची सुपारी दिली होती. त्यानंतर बिलाल आणि सौफिया यांनी वसई जवळील नायगाव परिसरात नेवून दोघांनी धारदार शस्त्राने कामरुद्दीनची हत्या केली व झाडी झुडपात त्याचा मृतदेह फेकून दिला होता. त्यानंतर पत्नी अशिया हिनेच तो बेपत्ता असल्याची तक्रार बांगूरनगर पोलीस ठाण्यात दिली.

27 जानेवारी ला वालीव पोलिसांना हा मृतदेह सापडल्यानंतर त्याची ओळख पटवण्याचे मोठे आवाहन पोलिसांसमोर होते. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता मीरा- भाईंदर, वसई -विरार पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा 2 च्या पथकाने मुंबई, ठाणे व आजूबाजूच्या परिसरातील पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या मिसिंग तक्रारींचा शोध घेतला व मृतदेहाची ओळख पटवून त्याचे राहते घर गाठले. त्याठिकाणी केलेल्या चौकशीत मयत कमरुद्दीनच्या घराच्या शेजारी राहणारे पती-पत्नी बिलाल आणि सौफिया गुन्हा घडल्यापासून घरातून निघून गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
त्याआधारे पोलिसांनी या पती-पत्नीला गुजरात वापी परिसरातून ताब्यात घेतले. त्यांच्याकडून केलेल्या चौकशीत त्यांनी कमरुद्दीनच्या हत्येची कबुली दिली असल्याची माहिती गुन्हे शाखा 2 चे पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे यांनी दिली. अनैतिक प्रेम संबंधातून ही हत्या झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -