घरताज्या घडामोडीपश्चिम रेल्वेमार्गावरील लोकलच्या मोटरमनला चक्कर आली अन्...; मालाड स्थानकातील घटना

पश्चिम रेल्वेमार्गावरील लोकलच्या मोटरमनला चक्कर आली अन्…; मालाड स्थानकातील घटना

Subscribe

पश्चिम रेल्वे मार्गावरील एका लोकलमधील मोटरमनला चक्कर आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट ते बोरिवली या धावत्या लोकलमध्येच मोटरमन भोवळ आल्याने मोटरमन केबिनमध्ये पडले.

पश्चिम रेल्वे मार्गावरील एका लोकलमधील मोटरमनला चक्कर आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट ते बोरिवली या धावत्या लोकलमध्येच मोटरमन भोवळ आल्याने मोटरमन केबिनमध्ये पडले. मनीष कुमार असे या मोटरमनचे नाव असून, ही घटना मंगळवारी मालाड स्थानकात घडली. (Motorman Was Overworked Big Incident At Malad Station Was Discussed)

मिळालेल्या माहितीनुसार, 31 जानेवारी रोजी दुपारी 2:30 वाजण्याच्या सुमारास चर्चगेटहून धीम्या मार्गावरून बोरिवलीच्या दिशेने लोकल रवाना झाली. त्यानंतर लोकल 3:30 वाजताच्या सुमारास मालाड स्थानकात थांबली. यावेळी मोटरमन यांना चक्कर आल्याने ते केबिनमध्येच कोसळले. लोकलच्या गार्डने हा प्रकार उघडकीस आणताच तातडीने रेल्वे स्थानकातील वैद्यकीय पथकाने त्यांची तपासणी केली. रक्तदाब कमी झाल्याने त्यांना चक्कर येऊन ते कोसळल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. चौकशीअंती मोटरमन मनीष कुमार काही दिवस आधीपासूनच आजारी असल्याचे समोर आले आहे.

- Advertisement -

मनीष कुमार यांना लोकल मालाड स्थानकात आल्यावर चक्कर आल्याने मोठा अपघात टळला. कामाचा ताण असल्याने आजारी असतानाही कामावर उपस्थित असल्याने हा प्रकार घडल्याची चर्चा रेल्वे अधिकाऱ्यांमध्ये सुरू आहे. तसेच, मालगाड्यामध्ये लोको पायलट म्हणून मनीष कुमार कार्यरत होते. 24 जानेवारीला मोटरमन म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली होती. मोटरमनपदी नियुक्त झाल्यापासून त्यांच्या प्रकृतीत अस्वस्थता जाणवत असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.

सुदैवाने लोकल धावत असताना मोटरमन कोसळले नसल्याने मोठी दुर्घटना टळली. या घटनेच्या निमित्ताने पुन्हा एकदा मोटरमन यांची ड्युटी, त्यांच्या आरामाच्या सोयी आणि कामाचा ताण याबाबत लोकल मोटरमन आणि गार्ड यांच्या वर्तुळात चर्चेला सुरुवात झाली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – गोविंद पानसरे हत्येप्रकरणी आरोपींची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली; वाचा नेमके प्रकरण काय?

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -