घरदेश-विदेशभारतात मिळणार इथेनॉल मिश्रित पेट्रोल, जाणून घ्या नेमका काय होणार फायदा?

भारतात मिळणार इथेनॉल मिश्रित पेट्रोल, जाणून घ्या नेमका काय होणार फायदा?

Subscribe

What is Ethanol Petrol | सुरुवातीच्या टप्प्यात, 11 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील निवडक पेट्रोल पंपांवर उपलब्ध करून दिले जाणार आहे. या उपक्रमामुळे पेट्रोलवरील अवलंबित्व कमी होईल, अशी सरकारची अपेक्षा आहे. यामुळे परकीय चलनही वाचेल आणि जैव इंधनाच्या वापराला चालना मिळेल.

नवी दिल्ली – भारतात आता २० टक्के इथेनॉल मिश्रित पेट्रोल (Ethanol Petrol) मिळू शकणार आहे. कारण, इंडिया एनर्जी वीक 2023 (India Energy Week 2023) मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते या इथेनॉल मिश्रित पेट्रोलचे अनावरण करण्यात आले आहे.  अनेक दिवसांपासून सरकार इथेनॉलचा वापर वाढवण्याचा प्रयत्न करत होते, आता पहिल्या टप्प्यात पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉलचा (E-20) वापर सुरू करण्यात येत आहे. (Ethanol Petrol Launched by PM Narendra Modi)

सुरुवातीच्या टप्प्यात, 11 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील निवडक पेट्रोल पंपांवर उपलब्ध करून दिले जाणार आहे. या उपक्रमामुळे पेट्रोलवरील अवलंबित्व कमी होईल, अशी सरकारची अपेक्षा आहे. यामुळे परकीय चलनही वाचेल आणि जैव इंधनाच्या वापराला चालना मिळेल.

- Advertisement -

टप्प्याटप्प्याने योजना सुरू होणार

20 टक्के इथेनॉल असलेले मिश्रित इंधन भारतातील शहरांमध्ये टप्प्याटप्प्याने मिळणार आहे. पहिल्या टप्प्यात 15 शहरांचा समावेश केला जाईल, तर दुसऱ्या टप्प्यात पुढील दोन वर्षांत संपूर्ण देशात विस्तार केला जाईल. 11 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 84 पेट्रोल पंपांवर E-20 पेट्रोल उपलब्ध करून दिले जाणार आहे.

- Advertisement -

E-20 किंवा इथेनॉल 20 हे परिष्कृत आणि मिश्रित इंधनाचा एक प्रकार आहे. त्यात 20 टक्के इथेनॉल असेल, तर 80 टक्के पेट्रोल असेल. म्हणजेच ते पेट्रोल आणि इथेनॉल मिसळून बनवले जाते. आतापर्यंत इथेनॉल 10 चा वापर भारतात होत होता. ज्यामध्ये 10 टक्के इथेनॉल इंधनात मिसळले जात आहे.

मुदतीपूर्वीच E20 प्रायोगिक तत्त्वावर अस्तित्वात येत आहे. त्यामुळे हा प्रकल्प आता २०२५ पर्यंत वाढवण्यात आला आहे.  सध्या देशात इथेनॉलची उत्पादन क्षमता सुमारे 1,037 कोटी लिटर आहे. यामध्ये 700 कोटी लिटर ऊस आधारित आणि 337 कोटी लिटर धान्य आधारित उत्पादनाचा समावेश आहे. 2022-23 साठी पेट्रोल-इथेनॉल इंधनाची आवश्यकता 542 कोटी लिटर आहे. 2023-24 साठी 698 कोटी लिटर आणि 2024-25 साठी 988 कोटी लिटर आहे.

ऊस शेतकऱ्यांना फायदा

E-20 कार्यक्रमाचा सर्वाधिक फायदा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना होणार आहे. अतिरिक्त उत्पन्न म्हणून याकडे पाहिले जात आहे. गेल्या आठ वर्षांतील आकडेवारी पाहता इथेनॉल पुरवठादारांनी त्यातून ८१,७९६ कोटी रुपये कमावले आहेत, तर शेतकऱ्यांना ४९,०७८ कोटी रुपये मिळाले आहेत. परकीय चलन खर्चात देशाने 53,894 कोटी रुपयांची बचत झाली आहे. तसेच, यामुळे कार्बन-डायऑक्साइड (CO2) उत्सर्जन 318 लाख टन कमी झाले आहे. E-20 लाँच करण्यासोबतच, E20, फ्लेक्स फ्युएल, हायड्रोजन आणि CNG सारख्या हरित इंधनासाठी देशात ग्रीन मोबिलिटी रॅलीही आयोजित केल्या जात आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -