घरताज्या घडामोडीआप्पासाहेब धर्माधिकारी यांना ‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार’ जाहीर झाल्याने पुरस्काराची उंची वाढली -...

आप्पासाहेब धर्माधिकारी यांना ‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार’ जाहीर झाल्याने पुरस्काराची उंची वाढली – मुख्यमंत्री शिंदे

Subscribe

ज्येष्ठ समाजसेवक आणि निरूपणकार श्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांना वर्ष 2022 चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत माहिती दिली. तसेच, या पुरस्कारामुळे महाराष्ट्र भूषण पुरस्काराची उंची वाढली आहे.

ज्येष्ठ समाजसेवक आणि निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना वर्ष 2022 चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत माहिती दिली. तसेच, या पुरस्कारामुळे महाराष्ट्र भूषण पुरस्काराची उंची वाढली आहे. आप्पासाहेब धर्माधिकारी यांचे कार्य समाज जीवनामध्ये पोहोचलेले असून, अनेक उद्ध्वस्त होणारी कुटुंब त्यांच्या मार्गदर्शनामुळे वाचली आहेत, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. (the stature of the award increased due to Appasaheb Dharmadhikari announced Maharashtra Bhushan Award CM Eknath Shinde)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज रेवदंडा येथे ज्येष्ठ समाजसेवक आणि निरूपणकार श्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांची भेट घेतली. या भेटीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, “आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देताना आम्हाला आनंद होत आहे. हा पुरस्कार आप्पासाहेब यांना मिळणार असल्याने या पुरस्काराची उंची अधिक वाढणार आहे”, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

- Advertisement -

ज्येष्ठ समाजसेवक आणि निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार समितीच्या वतीने पुरस्कार देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच, तळागाळातील प्रत्येक मनुष्यासाठी, समाजाच्या सेवेसाठी आप्पासाहेबांनी आपले पूर्ण आयुष्य वेचले आहे.

14 मे 1946 रोजी जन्म झालेले पद्मश्री डॉ.दत्तात्रेय तथा आप्पासाहेब धर्माधिकारी गेले 30 वर्ष निरुपण करत असून अंधश्रध्दा, बालमनावर संस्कार करण्यासाठी त्यांनी विशेष बालसंस्कार बैठक सुरु केल्या आणि आदिवासी वाडी, वस्त्यांवर व्यसनमुक्तीचे मोठे कार्यही केले.

- Advertisement -

रायगड जिल्ह्यातील रेवदंडामध्ये आप्पासाहेबांचे प्राथमिक ते माध्यमिक शिक्षण झाले. बालपणापासून त्यांना कीर्तन,भजन, अध्यात्मिक वाचन याची आवड होती. याशिवाय त्यांना मैदानी खेळ व पोहणेही आवडायचे. तळागाळातील प्रत्येक मनुष्यासाठी, समाजाच्या सेवेसाठी आप्पासाहेबांनी आपले पूर्ण आयुष्य वेचले आहे. या कार्याची सुरुवात त्यांचे वडील डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी ह्यांनी 1943 सालापासून केली होती आणि आज तेच कार्य, तेवढ्याच जोमाने, तत्परतेने जगभर पोहोचविण्याचे कार्य आप्पासाहेब धर्माधिकारी करत आहेत.


हेही वाचा – आदित्य ठाकरेंच्या ताफ्यावरील दगडफेक प्रकरणात औरंगाबाद पोलिसांचा मोठा खुलासा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -