घरदेश-विदेशज्वालामुखी उद्रेक - इंडोनेशीयात ४३ जणांचा मृत्यू तर ६०० जखमी

ज्वालामुखी उद्रेक – इंडोनेशीयात ४३ जणांचा मृत्यू तर ६०० जखमी

Subscribe

इंडोनेशियावर सर्वात मोठी नैसर्गिक आपत्ती आली आहे. इंडोनेशियाच्या सुंदा खाडीत सुनामी आणि ज्वालामुखी फुटण्याची घटना घडली आहे.

इंडोनेशियात ज्वालामुखीचा उद्रेक झाल्याची घटना शनिवारी उशीरा रात्री घडली आहे. या ज्वालामुखी उद्रेकामुळे येथील  सुंदा खाडीत सुनामी आली आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे आतापर्यंत ४३ जणांचा मृत्यू झाला तर ६०० जण जखमी असल्याची माहिती इंडोनेशिया सरकारने दिली आहे. खाडीत सुनामी आल्यामुळे पाणी येथील शहरांमध्ये शिरले आहे. यामुळे दक्षिण सुमात्रा स्थित अनेक इमारतींचेही नुकसान झाले आहे. दरम्यान येथील लोकांमध्ये भितीचे वातावरण आहे. सरकाराने हाय अलर्ट जारी केला असून बचाव कार्य युद्ध स्तरावर सुरु आहे. मात्र अजूनही अनेक नागरिक बेपत्ता असल्याचे सांगितले जात आहे.

अशी आहे भौगोलिक स्थिती

इंडोनेशियात सुंदा खाडी ही जावा आणि सुमात्रा या दोन समुद्र किनाऱ्यांमध्ये आहे. ही खाडी जावा सुद्राला हिंदी महासागराला जोडते. या घटनेत सुमात्राच्या लामपुंग आणि जावाच्या सेरांग आणि पांदेलांग या क्षेत्रांना मोठ्या प्रमाणावर फटका बसला आहे. अनक क्राकातोआ हे एक छोटे बेट आहे. १९८३ मध्ये झालेल्या ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे हे बेट निर्माण झाले होते. येथे ज्वालामुखी उद्रेकामुळे समुद्रात एक मोठी लाट निर्माण झाली. काही नागरिकांनी याची शुटिंग केली. मात्र लाट मोठी असल्याने त्यांना आपला जीव वाचवत पळ काढावा लागला.

- Advertisement -

तिन महिन्यांपूर्वी झालेला भुकंप

इंडोनेशियाची भौगोलिक स्थिती पहाता यावर अनेक नैसर्गिक आपत्ती येत असतानाचे दिसून येते. यापूर्वी सप्टेंबर महिन्यात इंडोनेशियात भुकंप झाला होता. या भुकंपामुळे येथील सागरात सूनामी आली होता. या घटनेत तब्बल ८३२ लोकांचा मृत्यू झाला होता. सहा लाख लोकसंख्या असलेला हा देश अजून भुकंपाच्या धक्क्यापासून सावरले नव्हते त्यातच ज्वालामुखी फुटण्याची घटना घडली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -