घरमनोरंजनफुलराणीच्या रूपात कोण येणार? सोशल मीडियावर रंगल्या गप्पा

फुलराणीच्या रूपात कोण येणार? सोशल मीडियावर रंगल्या गप्पा

Subscribe

ती येणार… ती येणार… असं मागील वर्षभरापासून कानावर येत होतं, उत्सुकता वाढली होती, कुतूहल जागं झालं होतं, पण कोण ती, राणी की महाराणी? छे होSSS, ही तर ‘फुलराणी’… बरं ही फुलराणी आहे तरी कोण? याचं आणखी वेगळं कुतूहल. लवकरच या कुतुहलाचं उत्तर मिळणार आहे. तुमच्या, आमच्या, सर्वांच्या लाडक्या ‘फुलराणी’ची झलक पहायला मिळणार आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर २२ मार्चला सिनेमागृहात ‘फुलराणी’ भेटणार आहे, पण त्यापूर्वी १३ फेब्रुवारीला ‘फुलराणी’ प्रत्यक्ष अवतरणार आहे. यावेळी ‘फुलराणी’चा फर्स्ट लूक सोशल माध्यमातून रिव्हील करण्यात येणार आहे.

विश्वास जोशी यांच्या दिग्दर्शनाखाली ‘फुलराणी…अविस्मरणीय प्रेम कहाणी’ हा चित्रपट तयार करण्यात आला आहे. विश्वास जोशी, अमृता राव, श्वेता बापट या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते आहेत. जाई जोशी, श्री.ए.राव, स्वानंद केळकर या चित्रपटाचे निर्माते आहेत.

- Advertisement -


या चित्रपटात सुबोध भावे भूमिका साकारणार आहे. परंतु,त्याच्यासोबत असणारी फुलराणी नक्की कोण हे अद्यापही गुलदस्त्यातच आहे. त्यामुळे फुलराणीच्या रुपात कोण असणार आहे याकडे सर्व मराठी सिनेसृष्टीतील प्रेक्षकांचं लक्ष लागून राहिलं आहे. भक्ती बर्वे यांनी फुलराणी नाटकात भूमिका साकारली होती. त्यांची हीच भूमिका चित्रपटात कोण साकारू शकतं यावर सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहेत. त्यामुळे येत्या १३ फेब्रुवारीला सोशल मीडियाच्या माध्यमातून त्या फुलराणीचा चेहरा पाहायला मिळणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Priyanka Barve (@priyanka.barve)

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -