घरनवी मुंबईपोलिसांचे ‘अलर्ट नवी मुंबईकर’ मिशन; आयुक्त भारंबे अ‍ॅक्शन मोडमध्ये

पोलिसांचे ‘अलर्ट नवी मुंबईकर’ मिशन; आयुक्त भारंबे अ‍ॅक्शन मोडमध्ये

Subscribe

शहर पोलिसांनी नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आपत्कालीन परिस्थितीत मदत मिळावी यासाठी ‘अलर्ट नवी मुंबईकर’ उपक्रमांतर्गत ’डायल-११२’ सुविधा सुरू केली आहे. आपत्कालीन प्रतिसाद सेवेची नागरिकांना माहिती व्हावी त्याचप्रमाणे त्याची जनजागृती करण्यासाठी नवी मुंबई पोलिसांच्या वतीने वाशी येथील एक्झिबिशन सेंटरमध्ये ’डायल-११३ प्रमोशन’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. राज्याचे कायदा व सुव्यवस्था विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक कुलवंत कुमार सारंगल यांनी डायल ११२ वाहनांना झेंडा दाखवून या उपक्रमाचा शुभारंभ केला.

नवी मुंबई: शहर पोलिसांनी नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आपत्कालीन परिस्थितीत मदत मिळावी यासाठी ‘अलर्ट नवी मुंबईकर’ उपक्रमांतर्गत ’डायल-११२’ सुविधा सुरू केली आहे. आपत्कालीन प्रतिसाद सेवेची नागरिकांना माहिती व्हावी त्याचप्रमाणे त्याची जनजागृती करण्यासाठी नवी मुंबई पोलिसांच्या वतीने वाशी येथील एक्झिबिशन सेंटरमध्ये ’डायल-११३ प्रमोशन’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. राज्याचे कायदा व सुव्यवस्था विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक कुलवंत कुमार सारंगल यांनी डायल ११२ वाहनांना झेंडा दाखवून या उपक्रमाचा शुभारंभ केला.
या कार्यक्रमाप्रसंगी नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, पोलीस सह आयुक्त संजय मोहिते, अप्पर पोलीस आयुक्त गुन्हेमहेश घुर्ये, विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते, परिमंडळ २चे पोलीस उपायुक्त, पंकज डहाणे, गुन्हे शाखा पोलीस उपायुक्त अमित काळे, परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे तसेच संजय कुमार पाटील, तिरूपती काकडे, डॉ.प्रिती टिपरे (पोलीस अधिक्षक, डायल ११२) तसेच सर्व पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी आणि इतर अधिकारी, अंमलदार उपस्थित होते.

११२ नंबर विषयी प्रसार आणि जनजागृती
नवी मुंबईतील नागरीकांमध्ये डायल ११२ या नंबर विषयी प्रसार व जनजागृती व्हावी याकरीता ५ सुसज्ज वाहने त्यावर डायल ११२ पोस्टर्स लावून सतत ३ दिवस नवी मुंबई पोलीस आयुक्तालया अंतर्गत विविध भागामध्ये मुख्यत्वे करून ज्या ठिकाणी नागरीकांची गर्दी होते अशा ठिकाणी गस्त करून प्रसार व जनजागृती करणार आहेत. तसेच मुख्यत्वे ठिकाणी ४१,५०० पोस्टर्स लावून देखील लोकांमध्ये विषयी प्रसार व जनजागृती करण्यात येईल. २४ तास ३६५ दिवस ही सेवा सुरू राहणार आहे.

- Advertisement -

सर्वच गुन्ह्यांमध्ये वाढ
मागील वर्षभरात नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या क्षेत्रात सर्वच गुन्ह्यामध्ये वाढ झाल्याची कबुली पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी वार्षिक अहवाल सादर करताना दिली होती. वाढत्या घटनांना रोखण्यासाठी पोलीस यंत्रणा जागी झाली असून पोलीस आयुक्त भारंबे अ‍ॅक्शन मोडमध्ये आले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -