घरठाणेब्राह्मण समाजाने समाजाला दिशा देण्याचे काम केले

ब्राह्मण समाजाने समाजाला दिशा देण्याचे काम केले

Subscribe

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

ब्राह्मण समाजाने वर्षानुवर्षे समाजाला दिशा देण्याचे काम केले आहे. ज्यावेळी हाती तलवार घेऊन लढण्याची गरज होती, त्यावेळी लढण्याचे कामही केले. तर ज्यावेळी समाजसुधारणा करण्याची गरज होती.त्यावेळी समाजसुधारकांनी आपल्या समाजाच्या लोकांच्या विरोधातही उभे राहून समाज सुधारण्याचे कार्य केले असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी डोंबिवलीत केले. सोमवारी डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले कलामंदिरात ब्राह्मण बिजनेस नेटवर्क या संस्थेच्या माध्यमातून ब्राह्मण समाजातील उद्योजकांच्या परिषदेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहिले होते.

त्यावेळी बोलताना फडणवीस पुढे म्हणाले कि, नवोद्योजकाच्या पाठीशी एक संघटना म्हणून उभे राहणे आवश्यक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत देश आज अतिशय वेगाने प्रगती करून जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनलो आहोत. 2030 पर्यंत जगातील दुसर्‍या सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेच्या दिशेने आपली वाटचाल सुरू आहे. त्यासाठी व्यावसायिक प्रकारचा आणि व्यवसायिक दृष्टिकोन महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले. आयटी आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे आज व्यवसायांना अनेक संधी निर्माण झाल्या आहेत. या नव्या जगात आपली तरुणाई मोठ्या प्रमाणात काम करत असेल तर या सर्व उद्योजकांच्या पाठीशी एक संघटना म्हणून उभे राहणे आवश्यक आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून बीबीएन ब्राह्मण बिझनेस नेटवर्क हाच संदेश असल्याचे गौरवोद्गार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी काढले.

- Advertisement -

ब्राह्मण समाजाच्या अनेक कार्यक्रमांना आपण उपस्थित राहतो, मात्र या समाजाने कधीच काही मागितलं नाही. स्वयंभू असलेला समाज उत्तरोत्तर प्रगती करत आहे. मागणे काही वाईट नसतं ,राज्यकर्त्यांकडे मागितलचं पाहिजे. मात्र तुमच्याकडे काही मागणार नाही, आमच्या बळावर सर्व प्राप्त करू, हा आत्मविश्वास त्यापेक्षाही महत्त्वाचा असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री यांनी समाजाचे कौतुक केले. यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विविध क्षेत्रातील यशस्वी उद्योजकांच्या सत्कार करण्यात आला. दोन दिवस चाललेल्या या बीबीएन परिषदेमध्ये देशभरातील शेकडो यशस्वी उद्योजक व नवोद्योजक सामील झाले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -