घरमनोरंजन‘ताज- डिवायडेड बाय ब्लड’ ही नवी सीरिज मुघलांच्या वारसाहक्काच्या कथांवर आधारित

‘ताज- डिवायडेड बाय ब्लड’ ही नवी सीरिज मुघलांच्या वारसाहक्काच्या कथांवर आधारित

Subscribe

भारतातील सर्वांत मोठा एतद्देशीय ओटीटी तसेच बहुभाषिक गोष्टी सांगणारा प्लॅटफॉर्म ‘ताज- डिवायडेड बाय ब्लड’ या आपल्या आत्तापर्यंतच्या सर्वांत मोठ्या ओरिजिनल मालिकेची घोषणा करत आहे. काँटिलो डिजिटलने शोरनर विल्यम बोर्थविक, लेखक सायमन फँटोझो आणि दिग्दर्शक रोनाल्ड स्कॅल्पेलो यांच्यासह या मालिकेची निर्मिती केली आहे. मुघल साम्राज्याच्या प्रतिष्ठित आसमंतात रंगलेली वारसानाट्ये आणि अंतर्प्रवाहांबद्दल ‘ताज- डिवायडेड बाय ब्लड’ खूप काही सांगते.

ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र, लावण्यवती अदिती राव हैदरी आणि आशीम गुलाटी, ताहा शाह, शुभम कुमार मेहरा यांच्यासारखे देखणे अभिनेते, वैविध्यपूर्ण अभिनयाने संपन्न संध्या मृदुल आदींच्या उपस्थितीत अत्यंत भव्य पद्धतीने या शोची घोषणा करण्यात आली. त्याचबरोबर ZEE5चे प्रवक्ते मनीष कालरा (चीफ बिझनेस ऑफिसर, ZEE5 इंडिया), निमिषा पांडे (चीफ काँटेण्ट ऑफिसर- हिंदी ओरिजिनल्स, ZEE5) आणि काँटिलो डिजिटलचे निर्माते अभिमन्यू सिंग हेही यावेळी उपस्थित होते. कार्टर रोड प्रोमेनाड या मुंबईतील सर्वांत लोकप्रिय हँगआउट स्थळावर, शोच्या लोगोचे अनावरण करण्यात आले. पडदे बाजूला खेचल्यानंतर 40 फुटांचा लोगो प्रदिप्त झाला तेव्हा प्रेक्षक विस्मयचकीत व रोमांचित झाले होते.

- Advertisement -

‘ताज- डिवायडेड बाय ब्लड’ या शोमध्ये सम्राट अकबराचा कार्यकाळ दाखवण्यात आला आहे. आपल्या भव्यदिव्य गादीसाठी पात्र वारसाच्या शोधातील अकबर यात दाखवण्यात आला आहे. अकबरानंतरच्या पिढ्या कशा उदयाला आल्या व त्यांचे पतन कसे झाले हे या मालिकेत नाट्यमय पद्धतीने दाखवले आहे. या महान घराण्याची शान व क्रौर्य यामध्ये दाखवले आहे. मुघलांना कला, काव्य व स्थापत्याबद्दल वाटणारे प्रेम आणि त्याच वेळी सत्तेसाठी स्वत:च्याच कुटुंबातील सदस्यांबाबत थंड डोक्याने त्यांनी घेतलेले निर्णय या शोमध्ये दाखवण्यात आले आहेत.

‘ताज- डिवायडेड बाय ब्लड’मध्ये कलावंतांची तगडी फौज आहे. अकबराच्या भूमिकेत नसीरुद्दीन शाह, तर अनारकलीच्या भूमिकेत अदिती राव हैदरी आहे. शहजादा सलीमच्या भूमिकेत आशीम गुलाटी, शहदाजा मुरादच्या बूमिकेत ताहा शाह आणि शहजादा दानियालच्या भूमिकेत शुभम कुमार मेहरा आहे. राणी जोधाबाईच्या भूमिकेत संध्या मृदुल, राणी सलीमाच्या भूमिकेत झरीना वहाब, मेहरुन्नीसाच्या भूमिकेत सौरसेनी मैत्रा आहे. राहुल बोस मिर्झा हकीमची भूमिका करत आहे, तर धर्मेंद्र शेख सलीम चिस्ती यांच्या भूमिकेत आहेत. या मालिकेत सुबोध भावे, आयाम मेहता, दीपराज राना, शिवानी टांकसाळे, पद्मा दामोदरन, पंकज सारस्वत, दिगंबर प्रसाद आणि झकारी कॉफिन सहाय्यक भूमिकांमध्ये आहेत.

- Advertisement -

हेही वाचा :

हार्दिक-नताशा पुन्हा अडकले विवाहबंधनात; फोटो व्हायरल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -