घरमनोरंजन"लग्न मनापासून होते, बाकी सर्व..." स्वराला आणि फहादच्या लग्नावर कंगनाची प्रतिक्रिया

“लग्न मनापासून होते, बाकी सर्व…” स्वराला आणि फहादच्या लग्नावर कंगनाची प्रतिक्रिया

Subscribe

स्वरा भास्कर आणि फहाद अहमदने 6 जानेवारी रोजी कोर्ट मॅरेज केलं. पुढच्या महिन्यात दोघेही पारंपारिक पद्धतीने लग्न करणार आहेत. काल लग्नाचे फोटो शेअर करत स्वराने ट्वीट केलं होतं

आपल्या बेधडक वक्तव्यांमुळे चर्चेत असणाऱ्या अभिनेत्री स्वरा भास्करने काल सोशल मीडियावरुन तिच्या लग्नाची घोषणा केली. स्वराने समाजवादी पक्षाचा नेता फहाद जिरार अहमदसोबत 6 जानेवारी रोजी कोर्ट मॅरेज केलं होतं. मार्चमध्ये स्वरा आणि फहाद भव्य विवाह करणार आहेत. दरम्यान, स्वराच्या लग्नाची बातमी ऐकूण सर्वचजण आश्चर्यचकित झाले. आता अनेकजण तिला सोशल मीडियावरुन शुभेच्छा देत आहेत.

कंगनाने दिल्या स्वराला आणि फहादला शुभेच्छा

स्वरा भास्कर आणि फहाद अहमदने 6 जानेवारी रोजी कोर्ट मॅरेज केलं. पुढच्या महिन्यात दोघेही पारंपारिक पद्धतीने लग्न करणार आहेत. काल लग्नाचे फोटो शेअर करत स्वराने ट्वीट केलं होतं. यावर प्रतिक्रिया देत कंगना रनौतने लिहिलंय की, “तुम्ही दोघेही आनंदी दिसत आहात आणि देवाची कृपा आहे. लग्न मनापासून होते, बाकी सर्व औपचारिकता आहे.”

- Advertisement -

दरम्यान, स्वरा भास्कर आणि कंगना रनौत मागील काही काळापासून त्यांच्या वादामुळे चर्चेत आहेत. स्वरा आणि कंगनाने दोन चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. 2011 मध्ये ‘तनु वेड्स मनु’ आणि 2015 मध्ये ‘तनु वेड्स मनु रिटर्न्स’मध्येही दोघे एकत्र दिसल्या होत्या. तसेच 2020 मध्ये, कंगनाने स्वरा आणि तापसी पन्नूला ‘बी-ग्रेड अभिनेत्री’ म्हणून संबोधल्यानंतर ट्विटरवर दोघींमध्ये वाद झाला होता.

 

- Advertisement -

हेही वाचा :

स्वरा भास्करने दिला सुखद धक्का; सपा नेत्यासोबत थाटला संसार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -