घरमहाराष्ट्रठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का; कसबा पेठ, चिंचवड निवडणुकीपर्यंतच वापरता येणार मशाल चिन्ह

ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का; कसबा पेठ, चिंचवड निवडणुकीपर्यंतच वापरता येणार मशाल चिन्ह

Subscribe

केंद्रीय निवडणुक आयोगाने ठाकरे गटाला पुन्हा एक मोठा धक्का दिला आहे. उद्धव ठाकरे यांच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला मशाल हे चिन्ह आणि नाव केवळ कसबा आणि चिंचवड निवडणुकीपर्यंतच वापरता येणार आहे. निवडणुक आयोगाच्या ऑर्डरमध्येचं तसं नमूद करण्यात आलं आहे.

विधिमंडळ आणि संसदेतील बहुमताच्या आधारेवर शिंदे गटाला शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह देण्यात आलं, आणि अंधेरी पोटनिवडणुदरम्यान दिलेलं त्यांच ढाल तलवार हे चिन्ह गोठवलं. यानंतर आता ठाकरे गटाला दिलेलं मशाल हे चिन्ह देखील त्यांना कसबा, चिंचवड पोटनिवडणुकीपर्यंत वापरण्यात येणार असल्याचा निर्णय दिला आहे. त्यामुळे 26 फेब्रुवारीपर्यंतच या चिन्ह आणि पक्षाचं नाव वापरण्याची परवानगी असेल. त्यानंतर हे चिन्ह वापरता येणार नाही.

- Advertisement -

कसबा पेठ पोटनिवडणुकीत ठाकरे गटाने आपला उमेदवार दिला नाही, पण या निवडणुकीत मविआने एकमताने काँग्रेस उमेदवार रविंद्र धंगेकर यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. यामुळे या निवडणुकीत तरी ठाकरे गटाकडून मशाल चिन्हाचा वापर होणार नाही. पण कसबा पेठ निवडणुकीनंतर म्हणजे 26 जानेवारीनंतर ठाकरे गटाकडून मशाल हे चिन्ह सुद्धा जाणार आहे. त्यामुळे कसबा पेठ निवडणुकीच्या निकालानंतर आता उद्धव ठाकरेंकडे कोणतं निवडणुक चिन्ह नसेल.

केंद्रीय निवडणुक आयोगाने ठाकरे गटालाकसबा पेठ निवडणुकीपर्यंतचं मशाल चिन्ह वापरण्यास परवानगी दिली असली तरी ठाकरे गट त्या चिन्हावर नव्याने दावा करू शकतात. मात्र समाजवादी पार्टीने पुन्हा एकदा या चिन्हावर दावा ठोकला आहे. त्यामुळे निवडणूक आयोग यावर काय निर्णय घेणार याकडे सर्वांच लक्ष लागून आहे.

- Advertisement -

एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांसह एक वेगळा गट तयार करत भाजपच्या पाठिंब्याने सत्ता स्थापन केली. यानंतर अंधेरी पोटनिवडणुकीत शिंदे गटाने शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्हावरही आपला हक्क सांगितला. यानंतर निवडणुक आयोगाने धनुष्यबाण हे चिन्ह आणि शिवसेना हे नाव गोठवलं. यानंतर ठाकरे गटाला मशाल हे चिन्ह आणि त्यांच्या पक्षाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव देण्याच आलं. तर शिंदे गटाला ढाल-तलवार हे चिन्ह आणि बाळासाहेबांची शिवसेना हे नाव देण्यात आलं होतं.

मात्र निवडणूक आयोगाने शिंदे गट आणि ठाकरे गटातील या वादावर आज अखेर निर्णय दिला आहे. निवडणूक आयोगाने शिंदे गटाला आता शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह वापरण्याची परवानगी दिली आहे. पण ठाकरे गटाला 26 फेब्रुवारीनंतर निवडणूक आयोगाने दिलेलं मशाल चिन्ह आणि पक्षाचं उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव वापरता येणार नाही.


मनसेमधील पक्षांतर्गत नाराजी चव्हाट्यावर; रायगडमधील खंदा पदाधिकारी शिंदे गटाच्या वाटेवर


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -