घरठाणेसहायक आयुक्तांना लाचप्रकरणी अटक

सहायक आयुक्तांना लाचप्रकरणी अटक

Subscribe

उल्हासनगर शहरात अनधिकृत बांधकामे सुरूच आहेत. येथील बांधकाम ठेकेदार अनधिकृत बांधकामे करुन शहराची विल्हेवाट लावत आहेत. नुकतेच पालिकेच्या दोन मुकादमांना लाच घेताना अटक झाल्याची घटना ताजी असताना होळीच्या दिवशी महापालिकेचा सहायक आयुक्त अजित गोवारी आणि त्याचे दोन साथीदारांना २० हजार रुपयाची लाच घेताना अटक केली आहे. लाचप्रकरणी अटक झालेल्यांची नावे अजित गोवारी, प्रकाश संकत आणि प्रदिप उमाप अशी आहेत. उल्हासनगर महापालिकेच्या प्रभाग समिती क्रमांक एक अंतर्गत एका बांधकाम ठेकेदाराने टियर गेटरचे अवैध बांधकाम सुरु केले होते. हे बांधकाम बेकायदेशीर असल्याने प्रभाग समितीतील मुकादम प्रकाश संकत याने प्रभाग अधिकारी अजित गोवारी यांच्या नावाने त्या ठेकेदाराकडे प्रथम ५० हजार रुपयाची मागणी केली होती.

ठेकेदाराने पैसे दिले नाही म्हणून त्याचे बांधकाम तोडण्यात आले. बांधकाम तोडल्यानंतर पुन्हा पैश्यांची मागणी करण्यात आली. या वेळी ठेकेदाराने पैसे देण्याचे कबूल केले. परंतु वेळेवर पैसे दिले नाही. म्हणून त्याचे बांधकाम पुन्हा दुसर्‍यांदा पाडण्यात आले. शेवटी नाईलाजस्तव २० हजार देण्याचे कबुल करुन त्या ठेकेदाराने ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे ३ मार्च रोजी तक्रार केली. या तक्रारीची दखल घेत त्या विभागाचे पोलिस अधिक्षक सुनिल लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक योगेश देशमुख यांनी आपल्या सहकार्‍यासह प्रभाग समिती क्रमांक १ मध्ये ६ मार्च रोजी दुपारी दोन वाजता सापळा लावला. त्या सापळ्यात प्रकाश संकत हा २० हजार रुपये घेताना पकडला गेला. त्याने पैसे हातात घेताच महापालिकेतील कंत्राटी ड्रायव्हर प्रदिप उमाप याच्या हातात दिल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यानी दोघांनाही ताब्यात घेतले. या पैशाची मागणी सहायक आयुक्त अजित गोवारी यांच्या सांगण्यावरुन केल्याची कबुली मुकादम प्रकाश संकत याने दिल्यावर गोवारी यांनाही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यानी ताब्यात घेतले. सर्व चौकशीकेल्यांतर तिघाना ही अटक करण्यात आली आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -