घरअर्थसंकल्पीय अधिवेशन 2023प्रतिवर्षी १२ हजारांची मदत, तर १ रुपयात विमा; शेतकऱ्यांसाठी सरकारकडून भरघोस मदत

प्रतिवर्षी १२ हजारांची मदत, तर १ रुपयात विमा; शेतकऱ्यांसाठी सरकारकडून भरघोस मदत

Subscribe

मुंबई – शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून गेल्या काही दिवसांत विधिमंडळ गाजत असताना आज सादर झालेल्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी भरघोस मदत केली आहे. नव्या-जुन्या योजनांचा उल्लेख करत सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यानुसार, शेतकऱ्यांना आता प्रतिवर्षी १२ हजार रुपये मिळणार असून अवघ्या १ रुपयांत विमा काढता येणार आहे.

पंतप्रधान कृषी सन्मान योजनेत राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान योजना जाहीर करण्यात आली. पंतप्रधान कृषी सन्मान योजनेअंतर्गत केंद्र सरकार शेतकऱ्यांना ६ हजार रुपये प्रोत्साहन भत्ता देते. आता त्यात राज्य सरकारच्याही अनुदानाची भर पडली असून शेतकऱ्यांना प्रतिवर्षी एकूण १२ हजार रुपये शेतकऱ्यांना अनुदान मिळणार आहे. याचा लाभ १ कोटी १५ लाख शेतकऱ्यांना होणार आहे. यासाठी सन २०२३-२४ मध्ये सहा हजार ९०० कोटींची तरतूद प्रस्तावित आहे.

- Advertisement -

केंद्र सरकारच्या २०१६ च्या पंतप्रधान पीक विमा योजनेत विमा हप्त्याच्या दोन टक्के शेतकऱ्यांने भरण्याची तरतूद आहे. हा भारही कमी करून त्याच्या हिश्श्याचा भाग सरकार भरेल. फक्त एक रुपयात शेतकऱ्याला विमा पोर्टलवर नोंदणी करावी लागेल. या योजनेत वार्षिक तीन हजार ३३१२ कोटींची तरतूद.

महाराष्ट्रातील शेतकर्‍यांना कर्जमाफी योजनांचे लाभ

- Advertisement -

– 2017 च्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतील उर्वरित पात्र शेतकर्‍यांना योजनेचे लाभ देणार
– महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील लाभ या सरकारने दिले.
– 12.84 लाख पात्र शेतकर्‍यांच्या खात्यात 4683 कोटी रुपये थेट जमा

महाराष्ट्रातील शेतकर्‍यांना कर्जमाफी योजनांचे लाभ

– 2017 च्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतील उर्वरित पात्र शेतकर्‍यांना योजनेचे लाभ देणार
– महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील लाभ या सरकारने दिले.
– 12.84 लाख पात्र शेतकर्‍यांच्या खात्यात 4683 कोटी रुपये थेट जमा

महाराष्ट्रातील शेतकर्‍यांसाठी महाकृषिविकास अभियान

– राज्यातील शेतकर्‍यांच्या उत्पन्नवाढीसाठी महाकृषिविकास अभियान राबविणार
– पीक, फळपीक घटकाच्या उत्पादनापासून ते मूल्यवर्धनापर्यंत
– तालुका, जिल्हानिहाय शेतकरी गट, समूहांसाठी योजना
– एकात्मिक पीक आधारित प्रकल्प आराखडा तयार करणार
– 5 वर्षांत 3000 कोटी रुपये उपलब्ध करून देणार

‘मागेल त्याला शेततळे’ योजनेचा आता व्यापक विस्तार

– मागेल त्याला शेततळे योजनेचा आता व्यापक विस्तार
– आता मागेल त्याला शेततळे, फळबाग, ठिबक सिंचन, शेततळ्यांचे अस्तरीकरण
– मागेल त्याला शेडनेट, हरितगृह, आधुनिक पेरणीयंत्र, कॉटन श्रेडर
– या योजनेवर 1000 कोटी रुपये खर्च करणार

काजू बोंडूवर प्रक्रिया केंद्र, काजू फळ विकास योजना!

– 200 कोटी रुपयांच्या भांडवलासह कोकणासाठी काजू बोर्ड
– काजू बोंडूपेक्षा प्रक्रिया काजू बोंडूला 7 पट भाव
– उत्पन्नवाढीसाठी कोकणात काजू बोंडू प्रक्रिया केंद्र
– कोकण, चंदगड तसेच आजरा (कोल्हापूर) येथे काजू फळ विकास योजना
– 5 वर्षांसाठी 1325 कोटी रुपयांची तरतूद

गोपीनाथ मुंडे शेतकरी सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना आता राज्य सरकारकडून, लाभही 2 लाखांपर्यंत

– गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना यापूर्वी विमा कंपन्यांकडून
– आता गोपीनाथ मुंडे शेतकरी सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना
– ही योजना राज्य सरकार राबविणार, त्यामुळे शेतकर्‍यांचा पूर्ण त्रास वाचणार
– अपघातग्रस्त शेतकर्‍यांच्या कुटुंबांना पूर्वीच्या 1 लाखाहून आता 2 लाख रुपयांपर्यंत लाभ

नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन
– नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देणार
– 3 वर्षांत 25 लाख हेक्टर क्षेत्र सेंद्रीय शेतीखाली आणणार
– 1000 जैवनिविष्ठा स्त्रोत केंद्र स्थापन करणार
– डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशनची व्याप्तीवाढ
– 3 वर्षांत 1000 कोटी रुपये निधी

श्री अन्न उत्कृष्टता केंद्र सोलापुरात स्थापन करणार

– आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्षानिमित्त महाराष्ट्रात ‘श्रीअन्न अभियान’
– 200 कोटी रुपयांची आर्थिक तरतूद
– सोलापुरात श्री अन्न उत्कृष्टता केंद्र स्थापन करणा

नागपुरात कृषी सविधा केंद्र, विदर्भात संत्राप्रक्रिया केंद्र

– नागपुरात डॉ. पंजाबराव देशमुख कृषी महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय कृषी सुविधा केंद्र स्थापन करणार
– अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि प्रसार हा उद्देश
– या केंद्रासाठी 228 कोटी रुपये देणार
– नागपूर जिल्ह्यातील नागपूर, काटोल, कळमेश्वर, अमरावती जिल्ह्यात मोर्शी, बुलढाणा जिल्ह्यात आधुनिक संत्रा प्रक्रिया केंद्र /20 कोटी रुपये तरतूद

शेतकर्‍यांना अन्नधान्याऐवजी थेट रोखीने आर्थिक मदत!

– विदर्भ, मराठवाड्यातील 14 आपत्तीग्रस्त जिल्ह्यांना केशरी शिधापत्रिकाधारकांना थेट आर्थिक मदत
– अन्नधान्याऐवजी रोख रक्कम थेट आधार बँक खात्यात
– प्रतिवर्ष, प्रतिशेतकरी 1800 रुपये देणार

शेतमाल विक्रीसाठी आलेल्या शेतकर्‍यांना निवारा-भोजन

– कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतमाल विक्रीसाठी येणार्‍या शेतकर्‍यांना सुविधा
– शेतकर्‍यांच्या मुक्कामासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन
– जेवणासाठी शिवभोजन थाळीची उपलब्धता

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -