घरक्राइमघाटकोपरमधील 'त्या' जोडप्याच्या मृत्यूमागचं गुढ वाढलं, पोलिसांसमोर मोठं आव्हान

घाटकोपरमधील ‘त्या’ जोडप्याच्या मृत्यूमागचं गुढ वाढलं, पोलिसांसमोर मोठं आव्हान

Subscribe

मुंबई – मुंबईतील घाटकोपरमध्ये असलेल्या पंतनगर येथे राहणाऱ्या एका दाम्पत्याचा होळी खेळून घरी आल्यानंतर मृत्यू झाल्याची माहिती काल समोर आली होती. या धक्कादायक घटनेने खळबळ उडाली असून या प्रकरणाचा पोलिसांकडून अधिक तपास करण्यात येत आहे. दीपक शहा (वय वर्ष ४४) आणि टिना शहा (वय वर्ष ३९) असे मृत्यू झालेल्या पती-पत्नीचे नाव आहे. दीपक शहा हे कपड्यांचे व्यायवसायिक असून ते घाटकोपर येथील पंतनगरमध्ये असलेल्या कुकरेजा पॅलेसमध्ये राहण्यास होते. दरम्यान याप्रकरणी पोलिसांना महत्त्वपूर्ण माहिती सापडली आहे.

धुळवडीच्या दिवशी मंगळवारी दुपारी ३.३० वाजता छेडा नगर जंक्शनपासून अवघ्या २०० मीटर अंतरावर दिसले होते. त्यानंतर, ९.३० पर्यंत ते कुठे होते हे समजू शकलेलं नाही. त्यामुळे हे जोडपं सहा तास नेमकं कुठे होतं हे शोधण्याचं पोलिसांसमोर मोठं आव्हान आहे. या तपासासाठी दोन पथके तैनात करण्यात आली आहेत.

- Advertisement -

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी अनेक ठिकाणी होळी साजरी करण्यात अली. त्यानुसार शहा दाम्पत्याने देखील आपल्या शेजाऱ्यांसह आणि कुटुंबियांसह होळी साजरी केली. त्यानंतर ते पुन्हा आपल्या घरी आले. दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास त्यांची गृहसेविका घरी आली. तिने बेल वाजवल्यावरही कोणी प्रतिसाद दिला नाही. मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पंरतु मोबाईलची रिंग वाजण्याचा आवाज येत होता, परंतु कोणीही उचलत नव्हतं. त्यानंतर तिने गृहसेविकेने दीपक यांच्या आई कांताबेन यांना फोन केला. यानंतर शहा यांच्या कुटुंबीयांनी दुपारच्या सुमारास त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु शहा दाम्पत्याकडून काहीच प्रतिसाद देण्यात आला नाही. यामुळे शहा यांच्या कुटुंबीयांनी त्यांचे घर गाठले आणि दुसऱ्या चावीच्या साहाय्याने दरवाजा उघडला.

- Advertisement -

शहा यांच्या घराचे दार उघडल्यानंतर या पती-पत्नीचा मृतदेह त्यांच्या नातेवाईकांना घराच्या बाथरूमध्ये सापडल्याने त्यांना एकच धक्का बसला. या घटनेची माहिती तात्काळ पंतनगर पोलिसांना देण्यात आली. पंतनगर पोलिसांकडून तात्काळ घटनास्थळी धाव घेत दीपक शहा आणि टिना शहा यांना राजावाडी रुग्णालयात नेण्यात आले. परंतु याठिकाणी डॉक्टरांनी दोघांना मृत घोषित केले.

दरम्यान, शहा दाम्पत्य हे कुकरेजा पॅलेस इमारतीत दोघेच राहत होते. होळी खेळून घरी गेल्यानंतर अंघोळ करताना या दोघांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच त्यांच्या शरीरावर कोणत्याही जखमा किंवा मारहाणीच्या खुणा देखील आढळून आलेल्या नाहीत. या दोघांचा मृत्यू हा बाथरूममध्ये असलेल्या गीजर गॅसच्या गळतीमुळे बाथरूममध्ये कोंडून झाल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु, या घटनेमुळे शहा यांच्या नातेवाईकांना आणि शेजारच्यांना धक्का बसला आहे. कारण त्या सर्वांनी एकत्र होळी साजरी केल्यानंतर काहीच वेळात अशी घटना घडल्याने या परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -