घरमहाराष्ट्रपुणेपुण्यात संध्याकाळच्या वेळी रात्री सारखा गडद अंधार! अवकाळी पावसाची जोरदार बॅटींग

पुण्यात संध्याकाळच्या वेळी रात्री सारखा गडद अंधार! अवकाळी पावसाची जोरदार बॅटींग

Subscribe

आकाशात ढग दाटून आल्यानं सायंकाळच्या वेळी सगळीकडे रात्रीसारखा गडद अंधार दिसून आला. त्यामुळे रस्त्यावर सायंकाळी ५ च्या सुमारास हेडलाईट लावण्याची वेळ वाहन चालकांवर आली.

मार्च महिन्यात सूर्य आग ओकत असून उन्हाच्या चटक्यांनी लोक घामाघूम होत असतात. पण यंदाच्या मार्चमध्ये वातावरणात उलटे चक्र वाहताना दिसून येत आहे. हिवाळ्यानंतर आता कडक उन्हाचे चटके बसणार या चिंतेत असलेल्या लोकांना ऐन उन्हाळ्यात पावसाळा अनुभवता आला. पुण्यात अवकाळी पावसाची जोरदार बॅटींग सुरू असून ऐन संध्याकाळच्या वेळी अक्षऱशः रात्रीसारखा गडद अंधार दिसून आला.

पुणेकर आपल्या कामावरून घरी परतत असताना अचानक सायंकाळी पाचच्या सुमारास अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे अचानक आलेल्या पावसाने पुणेकरांची चांगलीच तारांबळ उडाली. हडपसर, कोथरूड, सिंहगड रस्ता, मध्यवर्ती पेठा, कॅम्प परिसर, सातारा रस्ता या भागात जोरदार पाऊस सुरू आहे. तर कोथरुडमधील पौंडा रोड, जय भवानी नगर, सुतारदरा, जिजाऊनगर, गुजरात कॉलनी, आनंदनगर, भुसारी कॉलनी या परिसरात वीजांच्या कडकडाटासह पाऊस सुरू झाला.

- Advertisement -

आकाशात ढग दाटून आल्यानं सायंकाळच्या वेळी सगळीकडे रात्रीसारखा गडद अंधार दिसून आला. त्यामुळे रस्त्यावर सायंकाळी ५ च्या सुमारास हेडलाईट लावण्याची वेळ वाहन चालकांवर आली. तर अनेक घरांमध्ये तर चार-साडे चार वाजण्याच्या सुमारास तिन्ही सांजेच्या आधीच दिवे लावावे लागले. आज पहाटेपासूनच पुण्यात आभाळ भरून आलेलं दिसलं.

पुढील तीन दिवस हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलाय. अचानक आलेल्या अवकाळी पावसाने वाहतूक कोंडी देखील पहायला मिळाली. भारती विद्यापीठ, कात्रज, कोंढवा रस्ता, सुखसागरनगर, कोंढवा भागात ढग जमा झाले असून, वादळी वाऱ्यासह आणि ढगांच्या गडगडाटासह पावसाला सुरुवात झाली आहे. खडकवासला, शिवणे-उत्तमनगर परिसरात विजांच्या कडकडाटासह पाऊस सुरु झाला आहे. मुंडवा केशवनगर परिसरात मध्ये काळे कुट्ट ढग जमा झाले आहेत. तर बाणेर बालेवाडी परिसरात काळे कुट्ट ढग जमा झाले असून, रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे. औंध, सकाळ नगर येथे ढगांची गर्दी झाली असून हलका पाऊस सुरू झाला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -