घरदेश-विदेश"हा अहंकार येतो कुठून?", राहुल गांधींबाबत अमित शाहांची प्रतिक्रिया

“हा अहंकार येतो कुठून?”, राहुल गांधींबाबत अमित शाहांची प्रतिक्रिया

Subscribe

"हा कसला उद्दामपणा आहे? तुम्हाला खासदार राहायचं आहे आणि कोर्टातही जायचं नाही. एव्हढा अहंकार कुठून येतो?", असा सवाल देखील यावेळी अमित शहांनी विचारला आहे.

आता काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावरील कारवाईवरून आता देशात राजकारण सुरू झाले आहे. काँग्रेस पक्ष याला सूडाचं कृत्य म्हणत आहे, तर देशात कोणीही कायद्यापुढे मोठं असू शकत नाही, असं भाजपने म्हटलंय. राहुल गांधींवर झालेल्या कारवाईबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. हा काँग्रेस पक्षाचा प्रचार असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे.

एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात मुलाखत देताना अमित शहांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. “लालू यादव यांना वाचवण्यासाठी अध्यादेश आणला होता. हा काँग्रेसच्या काळातला कायदा आहे. काँग्रेस सरकारमध्ये राहुल गांधींनी याला ‘फालतू’ बोलून अध्यादेश फाडला. तेव्हा कायदा केला असता तर आज ते वाचले असते. त्यांना इतका अहंकार आहे की ते अपीलही करत नाहीत. कोणीही काळे कपडे घातले नाहीत, पश्चात्ताप केला नाही, कारण हा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आहे. हा देशाचा कायदा आहे. गांधी कुटुंबासाठी वेगळा कायदा व्हावा, अशी काँग्रेसची इच्छा आहे. ते स्पीकरवर प्रश्न उपस्थित करतात, पण सदस्यत्वाच्या अपात्रतेबाबतचा निर्णय हा सर्वोच्च न्यायालयाचा होता.” असं म्हणत यावेळी अमित शहांनी राहुल गांधीवर निशाणा साधला.

- Advertisement -

हे ही वाचा: गिरीश बापट यांच्या निधनानंतर नारायण राणेंनी घेतली कुटूंबियांची भेट

“हा कसला उद्दामपणा आहे? तुम्हाला खासदार राहायचं आहे आणि कोर्टातही जायचं नाही. एव्हढा अहंकार कुठून येतो?”, असा सवाल देखील यावेळी अमित शहांनी विचारला आहे. गृहमंत्री अमित शाहा यापुढे बोलताना म्हणाले की, राहुल गांधी हे पहिले व्यक्ती नाहीत ज्यांचे संसदेचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे, याआधीही या कायद्यानुसार लोकांनी आपले खासदार गमावले आहेत.

- Advertisement -

हे ही वाचा: “प्रभू श्रीरामांचं नाव घेऊन….” राम नवमीच्या दिवशी उद्धव ठाकरेंचा शिंदेंवर निशाणा

शाह म्हणाले, “लालू प्रसाद यादव हे पहिले व्यक्ती होते, त्यानंतर जयललिता यांच्यावरही कारवाई करण्यात आली. राशिद अल्वी यांच्यावरही कारवाई करण्यात आली. राहुल गांधींसोबतच अशा १७ जणांवर कारवाई करण्यात आली आहे.”

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -