घरक्रीडाCSK vs GT : 'जखमी' धोनी पहिल्या सामन्यात खेळण्याची शक्यता कमी? कोण...

CSK vs GT : ‘जखमी’ धोनी पहिल्या सामन्यात खेळण्याची शक्यता कमी? कोण असेल चेन्नईचा कर्णधार

Subscribe

नवी दिल्ली : इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलचा थरार आजपासून सुरू होणार आहे. आज पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स हे संघ आमनेसामने असणार आहेत. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडणाऱ्या सामन्यापूर्वी चेन्नईच्या क्रिकेट चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर येत आहे. चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी पहिल्या सामन्यात खेळण्याची शक्यता कमी आहे. कारण त्याच्या डाव्या गुडघ्याला दुखापत झाल्याची माहिती मिळत आहे.

माध्यमातील वृत्तानुसार धोनीच्या डाव्या गुडघ्याला दुखापत झाल्यामुळे तो गुरुवारी (३० मार्च) नेटमध्ये सराव करण्यासाठीही उतरला नव्हता. त्यामुळे पहिल्या सामन्यात त्याच्या खेळण्याबाबत सस्पेन्स अजूनही कायम आहे. याप्रकरणी चेन्नई सुपर किंग्जचे मुख्य कार्यकारी अधिकारी काशी विश्वनाथन यांनी धोनीच्या खेळण्याबाबत माहिती दिली आहे.

- Advertisement -

चेन्नईमध्ये सराव करताना धोनीला गुडघ्याला दुखापत झाल्यामुळे तो पहिला सामना खेळणार नाही असे बोलले जात असले तरी चेन्नच्या सीईओनी या प्रकरणावर स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी माध्यमांना दिलेल्या निवेदनात म्हटले की, माझ्या माहितीनुसार महेंद्रसिंग धोनी 100 टक्के फीट आहे. त्याच्या दुखापतीबाबत माझ्याकडे अद्याप कोणतीही माहिती आली नाही. धोनी दुखापतीमुळे आजचा सामना खेळणार नसेल तर विकेटकीपिंगची जबाबदारी डेव्हन कॉनवे किंवा अंबाती रायडू यांच्यावर सोपवली जाऊ शकते, मात्र असे आतापर्यंत तरी ठरले नाही.

गेल्या हंगामात रवींद्र जडेजाना काही सामन्यांमध्ये चेन्नई सुपर किंग्जचे कर्णधारपद सांभाळले होते, मात्र संघाच्या खराब कामगिरीनंतर त्यांच्याकडून कर्णधारपद काढून घेतले होते आणि धोनी पुन्हा कर्णधार झाला होता. त्यामुळे आजच्या सामन्यात धोनी जर खेळला नाही तर चेन्नई सुपर किंग्जचे व्यवस्थापन संघाचे कर्णधारपद कोणाकडे सोपवते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

- Advertisement -

कर्णधारपदाचसाठी बेन स्टोक्स प्रबळ दावेदार
इंग्लंड संघाचा अष्टपैलू बेन स्टोक्सला चेन्नई सुपर किंग्जने 16.25 कोटी रुपये खर्च करून यावळेच्या हंगामासाठी खरेदी केले आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बेन स्टोक्सने कर्णधारपद सिद्ध केले आहे. त्यामुळे धोनीच्या अनुपस्थितीत चेन्नईचे कर्णधारपद बेन स्टोक्सकडे जाण्याची शक्यता अधिक आहे. परंतु बेन स्ट्रोक्स पहिल्या सामन्यासाठी पूर्णपणे पूर्णपणे तंदुरुस्त नसला तर मोईन अली हा कर्णधारपदासाठी पर्याय ठरू शकतो. मोईन अलीनेसुद्धा काही आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये इंग्लंड संघाचे नेतृत्व केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -