घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रफायनान्स कंपनीच्या कर्जाला कंटाळून युवकाची आत्महत्या

फायनान्स कंपनीच्या कर्जाला कंटाळून युवकाची आत्महत्या

Subscribe

नाशिक : घर खरेदीसाठी फायनान्स कंपनीचे घेतलेले कर्जाचे हप्ते थकत गेल्याने ३९ वर्षीय कर्जदाराने पाथर्डी फाटा परिसरातील राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जितेंद्र कापसे (वय ३९) रा. शिवगंगा सोसायटी पाथर्डी रस्ता असे आत्महत्या करणार्‍याचे नाव आहे.

इंदिराननगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जितेंद्र कापसे हे पाथर्डी फाटा येथील शिवगंगा सोसायटीमध्ये आपल्या कुटुंबियांसह राहत होतेे. त्यांनी घर घेण्यासाठी एका खासगी बँकेकडून पर्सनल लोन घेतले होते. त्याचा व्याजदरही जास्त होता. कापसे यांना बँकेचे हप्ते भरणे शक्य होत नसल्याने हप्ते थकत गेले होते. त्यांनी विविध ऑनलाईन अ‍ॅपवरून देखील कर्ज घेतल्याचे कुटुंबियांनी सांगितले. त्यातून कापसे यांनी बुधवारी (दि.२९) सकाळी ११ वाजेच्या सुमारास घरात कोणीही नसताना गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी कापसे यांनी चिट्ठी लिहून ठेवत त्यात कर्जाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे म्हटले आहे. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास इंदिरानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गणेश न्हारदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -