घरमनोरंजन'दृश्यम 2' पुढे ‘भोला’ पडला फिका; दुसऱ्या दिवशी कमाईत घसरण

‘दृश्यम 2’ पुढे ‘भोला’ पडला फिका; दुसऱ्या दिवशी कमाईत घसरण

Subscribe

बॉलिवूड अभिनेता अजय देवगणचा ‘भोला’ चित्रपट गुरुवारी रामनवमीच्या शुभ मुहूर्तावर सर्वत्र प्रदर्शित झाला. या चित्रपटात अजयसोबत तब्बूही मुख्य भूमिकेत आहे. अजय आणि तब्बूच्या जोडीने पुन्हा एकदा चाहत्यांची मनं जिंकली आहेत. ‘भोला’ हा चित्रपट प्रदर्शित होताच हा चित्रपट सोशल मीडियावर ट्रेंड करू लागला. ‘दृश्यम 2’ नंतर अजय देवगणचा आणखी एक चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करणार असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, भोलाच्या दुसऱ्या दिवसाच्या कमाई समोर येत आहे.

‘भोला’ने दुसऱ्या दिवशी कमावले इतके कोटी

रामनवमीच्या शुभ मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या ‘भोला’ चित्रपटाला भारतात उत्तम प्रतिसाद पाहायला मिळत आहे. मीडिया रिपोर्ट्नुसार, या चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी जवळपास 11.20 कोटी कमावले होते तर दुसऱ्या दिवशी 7.40 कोटी कमावले. या चित्रपटाने आत्तापर्यंत एकूण 18.60 कोटी कमावले आहेत. येत्या दिवसात हा चित्रपट किती कमाई करेल याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

काय आहे ‘भोला’ चित्रपटाची कथा?

- Advertisement -

‘भोला’ चित्रपटात तब्बू आणि अजय देवगण व्यतिरिक्त अमला पॉल, दीपक डोबरियाल, संजय मिश्रा आणि गजराज राव हे कलाकार देखील आहेत.‘भोला’ हा तमिळ चित्रपट ‘कैथी’चा रिमेक आहे. ‘दृश्यम 2’ नंतर या चित्रपटाद्वारे आता अजय आणि तब्बूची जोडी 9व्यांदा मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहे.


हेही वाचा :

‘सरी’ चित्रपटातील ‘संमोहिनी’ गाणं प्रेक्षकांच्या भेटीस

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -