घरदेश-विदेशइंडोनेशियातील पापुआ न्यू गिनीमध्ये 7.0 तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप, मोठ्या नुकसानाची भीती

इंडोनेशियातील पापुआ न्यू गिनीमध्ये 7.0 तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप, मोठ्या नुकसानाची भीती

Subscribe

नवी दिल्ली : यूएस भूगर्भीय सर्वेक्षणानुसार रविवारी (२ एप्रिल) मध्यरात्री इंडोनेशियातील पापुआ न्यू गिनीला 7.0 तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप झाला (A powerful 7.0 magnitude earthquake hits Papua New Guinea in Indonesia). यूएसजीएसने म्हटले की, हा भूकंप स्थानिक वेळेनुसार पहाटे 4 वाजता आला असून तटीय शहर वेवाकपासून 97 किलोमीटर अंतरावर आणि 62 किलोमीटर खोलीवर आला.

USGS ने म्हटले आहे की भूकंप झोनमधील हा परिसर विरळ लोकवस्तीचा असला तरी, परिसराचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. सिस्मॉलॉजी एजन्सीने म्हटले की, जमीनीच्या ढिलेपणामुळे, ज्याला द्रवीकरण म्हणून ओळखले जाते, त्यामुळे मोठ्या प्रमाणात जमीनीची घट होते आणि जमिनीला भेगा पडतात त्यामुळे मोठे नुकसान होऊ शकते.

- Advertisement -

इंडोनेशियाच्या सीमेपासून सुमारे 100 किलोमीटर पूर्वेला न्यू गिनी बेटावरील परिसर भूकंपाने हादरला आहे. न्यू ब्रिटन प्रदेश पूर्व पापुआ न्यू गिनीमधील द्वीपसमूहाचा भाग असून याठिकाणीही फेब्रुवारीच्या शेवटी ६.२ तीव्रतेचा भूकंप झाला होता.

- Advertisement -

भूकंप का आणि कसा होतो?
पृथ्वीच्या आत सात टेक्टोनिक प्लेट्स असून या प्लेट्स सतत फिरत असतात. जेव्हा या प्लेट्स एकमेकांवर आदळतात, एकमेकांना घासतात, एकमेकांच्या वर चढतात किंवा दूर जातात तेव्हा जमीन थरथरू लागते आणि भूकंप होतो. भूकंप मोजण्यासाठी रिश्टर स्केलचा वापर केला जातो. ज्याला रिश्टर मॅग्निट्युड स्केल असेही म्हणतात.
रिश्टर मॅग्निट्यूड स्केल 1 ते 9 पर्यंत आहे. भूकंपाची तीव्रता त्याच्या केंद्रावरून म्हणजेच केंद्रबिंदूवरून मोजली जाते. म्हणजेच त्या केंद्रातून बाहेर पडणारी ऊर्जा या प्रमाणात मोजली जाते. 1 म्हणजे कमी तीव्रतेची ऊर्जा बाहेर येत आहे. 9 म्हणजे जास्त तीव्रता. ज्यामुळे भयानक आणि विनाशकारी लाट येते. रिश्टर स्केलवर तीव्रता 7 दर्शविल्यास त्याच्या आसपासच्या 40 किलोमीटरच्या अंतरावर जोरदार धक्का बसतो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -