घरमहाराष्ट्रछत्रपती संभाजीनगरमहाविकास आघाडीचे प्रमुख नेते 'उद्धव ठाकरे'च, सभेतील 'या' गोष्टींनी होतंय स्पष्ट

महाविकास आघाडीचे प्रमुख नेते ‘उद्धव ठाकरे’च, सभेतील ‘या’ गोष्टींनी होतंय स्पष्ट

Subscribe

महाविकास आघाडीची काल रविवारी (ता. ०२ मार्च) छत्रपती संभाजीनगर येथे 'वज्रमूठ' ही जाहीर आणि विराट सभा झाली. पण या सभेतील काही गोष्टींमुळे महाविकास आघाडीचे प्रमुख नेते हे उद्धव ठाकरेच आहेत, हे यामुळे अधोरेखित झाले आहे.

काल (ता. ०२ मार्च) रविवारी छत्रपती संभाजीनगर येथे महाविकास आघाडीची ‘वज्रमूठ’ ही जाहीर आणि विराट सभा पार पडली. या सभेला महाविकास आघाडीचे सर्व प्रमुख नेते उपस्थित राहिले होते, पण काँग्रेसचे महाराष्ट्र अध्यक्ष हे तब्येतीच्या कारणास्तव उपस्थित राहू शकले नाही. या सभेसाठी भव्य असे व्यासपीठ देखील उभारण्यात आले होते. या व्यासपीठावर महाविकास आघाडीमधील सर्व नेत्यांना बसण्यासाठी एक सारख्या खुर्च्या ठेवण्यात आल्या होत्या. पण या व्यासपीठावर एक विशेष भगव्या रंगाची खुर्ची देखील ठेवण्यात आली होती. ती खुर्ची होती, ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासाठी.

महाविकास आघाडीच्या कालच्या सभेकडे राज्याचे लक्ष लागलेले होते. या सभेसाठी विशेष अशी तयारी देखील करण्यात आली होती. सभा सुरू झाल्यानंतर मविआच्या सर्व प्रमुख नेत्यांनी भाषणे केली. पण या भाषणांना लोकांना फार प्रतिसाद दिलेला पाहायला मिळाला नाही. पण माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे भाषण सुरू असतानाच उद्ध ठाकरे यांच्या एन्ट्रीने सभेला उपस्थित असलेल्या लोकांनी एकच जल्लोष केला.

- Advertisement -

उद्धव ठाकरे व्यासपीठावर येताच फटाक्यांची आतषबाजी देखील करण्यात आली. त्यानंतर उद्धव ठाकरे हे व्यासपीठावर त्यांच्यासाठी व्यासपीठाच्या मधोमध ठेवण्यात आलेल्या खुर्चीवर आसनस्थ झाले. त्यामुळे सभेत घडलेल्या या सर्व गोष्टींवरून महाविकास आघाडीचे प्रमुख नेते आणि नेतृत्व हे उद्धव ठाकरेच आहेत, हे या निमित्ताने सिद्ध झाले.

महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेमध्ये राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण यांनी सुरूवातीला भाषणे केली. पण लोकांना प्रतिक्षा होती ती उद्धव ठाकरे यांच्या भाषणाची. सभेमध्ये सगळ्यात शेवटी येऊन सगळ्यात शेवटी उद्धव ठाकरे यांचेच भाषण झाले. पण या भाषणाला मिळालेला लोकांचा प्रतिसाद हा पाहण्यासारखा होता. तर त्यांचे भाषण सुरू होण्याआधी देखील विशेष आतषबाजी देखील करण्यात आली. त्यामुळे उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व महाविकास आघाडीत असलेल्या इतर घटक पक्षातील नेत्यांनी देखील मान्य केले आहे, हे या सभेच्या माध्यमातून स्पष्ट झाले आहे. तर उद्धव ठाकरे हेच महाविकास आघाडीचे प्रमुख नेते आहेत का? अशी चर्चा देखील आता राजकीय वर्तुळात रंगू लागवली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – इंग्रजीत बोलाल तर होणार दंड, इटालियन सरकारचा निर्णय

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -