घरदेश-विदेशफोर्ब्स वर्ल्ड अब्जाधीशांच्या यादीत मुकेश अंबानी 'या' स्थानावर; गौतम अदानींची घसरण

फोर्ब्स वर्ल्ड अब्जाधीशांच्या यादीत मुकेश अंबानी ‘या’ स्थानावर; गौतम अदानींची घसरण

Subscribe

नवी दिल्ली : मुकेश अंबानी यांनी पुन्हा एकदा 83.4 अब्ज डॉलर्स संपत्तीसह आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनन्याचा मान मिळवला आहे, तर जगातील श्रीमंतांमध्ये ते 9व्या क्रमांकावर आहेत. त्याच वेळी, गौतम अदानी यांची 47.2 अब्ज डॉलर्स संपत्तीसह श्रीमंतांच्या जागतिक यादीत 24 व्या स्थानावर घसरण झाली आहे.

गौतम अदानी 24 जानेवारी 2023 पर्यंत 126 अब्ज डॉलर्स संपत्तीसह जगातील तिसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती होते. पण फोर्ब्सने मंगळवारी 2023 च्या अब्जाधीशांच्या यादी प्रसिद्ध केली. यात अमेरिकन शॉर्ट सेलर हिंडेनबर्ग रिसर्चच्या आरोपानंतर अदानी यांच्या संपत्तीत झपाट्याने घट झाल्यामुळे ते मुकेश अंबानी यांच्यानंतर आशियातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत.

- Advertisement -

विशेष बाब म्हणजे यावेळी विक्रमी 169 भारतीय अब्जाधीशांनी फोर्ब्स वर्ल्ड अब्जाधीशांच्या यादीत स्थान मिळवले आहे. 2022 मध्ये ही संख्या 166 होती. मात्र, या संख्येत वाढ होऊनसुद्धा या श्रीमंतांची संपत्ती 10 टक्क्यांनी घटून 675 अब्ज डॉलर्स झाली आहे. 2022 मध्ये त्यांची संपत्ती 750 अब्ज डॉलर्स होती. फोर्ब्सच्या सांगण्यानुसार मुकेश अंबानींच्या नेतृत्वाखालील रिलायन्स इंडस्ट्रीज (RIL) गेल्या वर्षी 100 अब्ज डॉलरचा महसूल कमावणारी पहिली भारतीय कंपनी ठरली होती. रिलायन्स इंडस्ट्रीजचा व्यवसाय तेल, दूरसंचार आणि रिटेलपर्यंत पसरलेला आहे.

टॉप-25 श्रीमंतांच्या संपत्तीत 200 अब्ज डॉलर्सची घट
फोर्ब्सच्या जागतिक अब्जाधीशांच्या यादीनुसार, जगातील 25 सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या संपत्तीत एका वर्षात तब्बल 200 अब्जा डॉलर्सने घट झाली आहे. 2022 मध्ये, त्यांची एकूण मालमत्ता 2,300 अब्ज डॉलर्स म्हणजे (2.3 ट्रिलियन) होती, जी आता 2,100 अब्ज डॉलर्स म्हणजे (2.1 ट्रिलियन) ऐवढी कमी झाली आहे. याचा सर्वात जास्त फटका जेफ बेझोस आणि इलॉन मस्क यांना बसला आहे. अॅमेझॉनचे मालक जेफ बेझोस यांच्या संपत्तीत सर्वाधिक ५७ अब्ज डॉलरची घट झाली आहे. इलॉन मस्कच्या संपत्तीत एका वर्षात 39 अब्ज डॉलरची घट झाली आहे.

- Advertisement -

बर्नार्ड अर्नांल्ट जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती
फ्रान्सचे बर्नार्ड अर्नांल्ट 211 अब्ज डॉलर्ससह जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. एलोन मस्क (180 अब्ज डॉलर्स) दुसऱ्या, जेफ बेझोस (114 अब्ज डॉलर्ससह) तिसऱ्या, लॅरी एलिसन (107 अब्ज डॉलर्ससह) चौथ्या आणि वॉरेन बफे (106 अब्ज डॉलर्ससह) पाचव्या स्थानावर आहेत. यानंतर बिल गेट्स (104 अब्ज डॉलर्ससह) सहाव्या स्थानावर, मायकेल ब्लूमबर्ग सातव्या, कार्लसन स्लिम हेलू आठव्या, मुकेश अंबानी नवव्या आणि स्टीव्ह बाल्मर दहाव्या स्थानावर आहेत.

सर्वात 10 श्रीमंत भारतीयांची यादी
1. मुकेश अंबानी 83.4 अब्ज डॉलर्स
2. गौतम अदानी 126 अब्ज डॉलर्स
3. शिव नाडर 25.6 अब्ज डॉलर्स
4. सायरस पूनावाला 22.6 अब्ज डॉलर्स
5. लक्ष्मी मित्तल 17.7 अब्ज डॉलर्स
6. सावित्री जिंदाल 17.5 अब्ज डॉलर्स
7. दिलीप सांघवी 15.6 अब्ज डॉलर्स
8. राधाकृष्ण दमानी 15.3 अब्ज डॉलर्स
9. कुमार मंगलम बिर्ला 14.2 अब्ज डॉलर्स
10. उदय कोटक 12.9 अब्ज डॉलर्स

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -