घरताज्या घडामोडीउद्धव ठाकरे व एकनाथ शिंदे एकत्र येण्यासाठी भाजपाचा 'हा' नेता मध्यस्थी करण्यास...

उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदे एकत्र येण्यासाठी भाजपाचा ‘हा’ नेता मध्यस्थी करण्यास तयार

Subscribe

गतवर्षी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत उभी फुट पडली. त्यानंतर शिवसेनेचे दोन गट निर्माण झाले. परंतु, आता उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदे एकत्र येण्यासाठी भाजपाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनी तयारी दर्शवली आहे.

गतवर्षी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत उभी फुट पडली. त्यानंतर शिवसेनेचे दोन गट निर्माण झाले. परंतु, आता उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदे एकत्र येण्यासाठी भाजपाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनी तयारी दर्शवली आहे. ‘हिंदुत्वाच्या मुद्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकत्र आलं पाहिजे’, असे विधान चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. चंद्रकांत पाटील यांच्या या विधानामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. (if uddhav thackeray and eknath shinde should come together i ready to mediate says chandrakant patil)

नेमके काय म्हणाले चंद्रकात पाटील?

- Advertisement -

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरे व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकत्र येण्याबाबत वक्तव्य केले. हिंदुत्वाच्या मुद्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकत्र आलं पाहिजे. मला वरिष्ठांकडून आदेश आल्यास मी या दोघांनाही एकत्र आणण्यासाठी पुढाकार घेईन’, असे विधान चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.

चंद्रकांत पाटलांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

- Advertisement -

“सध्या कोर्टाच्या निकालाबाबत बोलणे योग्य नाही. मात्र सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्यानंतर राज्यात मोठी उलथापालथ होणार असून, ठाकरे गटात जे उरले आहे तेही इकडे येतील. उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोसमोर उभं राहून एकदा विचार करायला हवा होता. त्यांनी ठाकरे कुटुंब म्हणून परिणामांचा विचार करायला हवा होता”, अशा शब्दांत चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला.

गतवर्षी जून महिन्यात एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड घडवून आणले आणि राज्याच्या सत्तेचा संपूर्ण सारीपाटच बदलून टाकला. मात्र त्यानंतर एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट यांच्यात सुरू असलेले वाद-विवाद व आरोप-प्रत्यारोपांचा फैरी असूनही सुरूच आहेत. उद्धव ठाकरेंकडून शिंदे व भाजपवर टीकेची झोड उठवून घायाळ केले असताना भाजप व शिंदे गटाकडूनही तिखट प्रतिहल्ला केला जात आहे.


हेही वाचा – राज्यात पुन्हा दगडफेक; नंदुरबार, छ. संभाजीनगर महामार्गावर दोन गटांत तुफान राडा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -