घरमुंबईDhananjay Munde सगळं काही परफेक्टली वेल, अजितदादांच्या भेटीनंतर धनंजय मुंडेची प्रतिक्रिया

Dhananjay Munde सगळं काही परफेक्टली वेल, अजितदादांच्या भेटीनंतर धनंजय मुंडेची प्रतिक्रिया

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांनी आज विधान भवनात अजित दादांची भेट घेतली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार ( ajit pawar) यांच्या बंडाच्या चर्चांनी राज्यात खळबळ उडाली आहे. याचदरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांनी आज विधान भवनात अजित दादांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी सगळं काही ठिक आहे, परफेक्टली वेल असं सूचक विधान केल्याने राजकीय वतुर्ळात तर्क वितर्कांना उधाण आलं आहे.

अजित पवार भाजपसोबत जाणार असल्याची चर्चा आहे. यामुळे अजित दादांच्या प्रत्येक हालचालींवर सगळ्यांचेच लक्ष आहे. याचदरम्यान, अजितदादांचे जवळचे म्हणून ओळखले जाणारे धनंजय मुंडे जे गेल्या दोन दिवसांपासून नॉट रिचेबल होते ते आज थेट विधानसभेत आले. तेथे त्यांनी अजित दादांची भेट घेतली. पंधरा मिनिटे अजित दादा आणि धनंजय मुंडे यांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली. मात्र कोणत्या विषयावर हीचर्चा झाली हे धनंजय मुंडे यांनी सांगितले नाही. उलट ‘सगळं काही ठीक आहे. परफेक्टली वेल’ असे सूचक विधान करत धनंजय मुंडे यांनी सगळं आलबेल आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -