घरठाणेअक्षय्य तृतीयाच्या मुहूर्तावर ठाण्यात नव्या रुग्णालयाचे भूमिपूजन; मुख्यमंत्र्यांची प्रमुख उपस्थिती

अक्षय्य तृतीयाच्या मुहूर्तावर ठाण्यात नव्या रुग्णालयाचे भूमिपूजन; मुख्यमंत्र्यांची प्रमुख उपस्थिती

Subscribe

ठाणे : साडे तीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त समजल्या जाणाऱ्या अक्षय्य तृतीयाच्या मुहूर्तावर ठाणे विठ्ठल सायन्ना शासकीय रुग्णालयाच्या (Thane Vitthal Sayanna Government Hospital) जागी नव्याने उभ्या राहणाऱ्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या भूमिपूजनाचा (Bhumi Poojan of Super Specialty Hospital) नारळ राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या हस्ते वाढवला जाणार आहे, तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis), आरोग्य मंत्री, ठाणे पालकमंत्री या मान्यवरांच्या उपस्थित हा सोहळा पार पडणार आहे. या भूमिपूजन सोहळ्यामुळे आता खऱ्या अर्थाने कामाला गती मिळणार आहे. तसेच ठाणेकर नागरिकांना कोणत्याही उपचार पद्धतीसाठी मुंबईची वाट धरावी लागणार नाही.

ठाणे जिल्ह्याची शान आणि गोरगरिबांच्या हक्काचे असलेले ठाणे विठ्ठल सायन्ना जिल्हा शासकीय रुग्णालय कात टाकत आहे. ते रुग्णालय पाडून त्याच ठिकाणी ९०० बेड्सचे सुपर स्पेशालिटी रुग्णालय उभारण्यात येणार आहे. यामध्ये ५०० बेड्सचे जिल्हा रुग्णालय, प्रत्येकी २०० बेड्सचे सेवा आणि महिला व बाल रुग्णालय असणार आहे. तसेच हेलिपॅडची सुविधा या रुग्णालयाच्या इमारतीमध्ये करण्यात येणार आहे. मध्यंतरी रुग्णालयाच्या आवारातील जीर्ण झालेल्या मुख्य इमारतीसह इतर इमारती पाडण्याचे काम झाले आहे. या ठिकाणी नवे रुग्णालय उभारण्याची शासनाने परवानगी दिली असून बांधकामासाठी निधीही मंजूर करण्यात आला आहे.

- Advertisement -

हे रुग्णालय नव्याने उभे राहावे ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची महत्वकांक्षा आहे. ते महाविकास आघाडी सरकारमध्ये आरोग्य मंत्री असताना नव्याने ५७४ बेड्सच्या रुग्णालयाचा जीआर निघाला होता. त्यानंतर ते मुख्यमंत्री झाल्यावर ९०० बेड्सच्या जीआरसह रुग्णालय बांधकामासाठी ५२७ कोटींचा निधी मंजूर झाला. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्तेच या नव्याने उभ्या राहणाऱ्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचा भूमिपूजन होणार आहे. रुग्णालय कसे असावे, ते काम लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी जुने रुग्णालय तितक्याच तातडीने स्थलांतर करणे आणि जीर्ण इमारती पाडकामासाठी ठाणे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलाश पवार यांनी ही तितकाच पुढाकार आणि पाठपुरावा केला आहे. एकंदरीत जुळून आलेल्या योगामुळे येत्या २२ एप्रिल रोजी अक्षय्य तृतीयाच्या दिवशी भूमिपूजनाचा नारळ वाढवला जाणार आहे.

जिल्हा शल्य चिकित्सक कैलाश पवार म्हणाले की, “नव्या रुग्णालयाच्या भूमिपूजनाच्या तारखेबाबत दुजोरा दिला आहे. त्यांनी सांगितले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आरोग्य मंत्री आदी मान्यवर मंडळीच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे. याचा मला आनंद आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -