घरक्राइमबदलापूरमध्ये पैशांच्या वादातून निवृत्त पोलिसाची हत्या

बदलापूरमध्ये पैशांच्या वादातून निवृत्त पोलिसाची हत्या

Subscribe

बदलापूरमध्ये एका निवृत्त पोलिसाचे अपहरण करून हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. पैशांच्या वादातून ही धक्कादायक घटना घडल्याचे सांगण्यात आले आहे.

बदलापूरमध्ये एका निवृत्त पोलिसाचे अपहरण करून हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. पैशांच्या वादातून ही धक्कादायक घटना घडल्याचे सांगण्यात आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच, या प्रकरणातील आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी देखील सुनावण्यात आलेली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बदलापूर गावात राहणारे अशोक मोहिते हे फिरून येतो असे सांगून घरातून बाहेर पडले होते. मात्र ते घरी न आल्याने त्यांचा मुलगा अमित मोहिते याने बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात ते बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्र फिरवत अशोक मोहिते यांचा शोध घेतला. या तपासात मोहिते यांचा मृतदेह मुरबाड तालुक्यातील देवघर धरण या ठिकाणी आढळून आला. बदलापूर गावातल्या चिंतामणी चौकात राहणारे अशोक मोहिते हे सेवा निवृत्त जेल पोलीस होते. त्यांचे त्यांच्याच इमारतीत राहणाऱ्या आरोपी महादू वाळकोळी आणि लक्ष्मण जाधव यांच्याशी पैशावरून वाद सुरु होते. हाच राग मनात धरून, दम्याचे औषध देण्याचा बहाणा करून महादू वाळकोळी आणि लक्ष्मण जाधव यांनी मिळून मोहिते यांची हत्या केली असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आलेली आहे.

- Advertisement -

धक्कादायक बाब म्हणजे, अशोक मोहिते यांची हत्या करून त्यांचा मृतदेह देवघर धरण परिसरात आरोपींनी पुरला होता. अशोक मोहिते आणि आरोपी महादू वाळकोळी हे एकाच इमारतीत वास्तव्याला आहेत. मयत अशोक मोहिते १२ एप्रिलला बाहेर फिरून येतो, असे सांगून घरातून बाहेर पडले होते. मात्र दोन दिवस ते घरी न परतल्याने बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. मोहिते बेपत्ता झाल्यांनतर त्यांच्या बँक खात्यावरून १५ एप्रिलला २५ हजार रुपये काढण्यात आले होते. यांनतर पोलिसांनी बँकेत चौकशी केल्यांनतर त्यांच्या खात्यावरून तब्बल दोन लाख तीन हजार रुपये आरोपी महादू वाळकोळीच्या खात्यावर जमा झाल्याचे समोर आले.

दरम्यान, आरोपी वाळकोळी फरार असतांना त्याने मयत मोहितेंचा मुलगा अमितशी संपर्क साधला होता. त्यानंतर अमितने महादू वाळकोळीवर संशय व्यक्त केला होता. यानंतर पोलिसांनी सखोल चौकशी करून आरोपी महादू वाळकोळी आणि लक्ष्मण जाधवला मुरबाड तालुक्यातील दुधनोली परिसरातुन ताब्यात घेतले. यावेळी त्याच्याकडून अशोक मोहिते यांचे ATM कार्ड सुद्धा ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – भारतीय वंशाच्या बेपत्ता सॉफ्टवेअर इंजिनिअरचा मृतदेह अमेरिकेतील तलावात सापडला

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -