घरदेश-विदेशभारतीय वंशाच्या राधा अय्यंगार प्लंब यांना US च्या संरक्षण मंत्रालयात मिळाले 'हे'...

भारतीय वंशाच्या राधा अय्यंगार प्लंब यांना US च्या संरक्षण मंत्रालयात मिळाले ‘हे’ महत्वाचे पद

Subscribe

मुंबई | भारतीय वंशाच्या राधा अय्यंगार प्लंब (Radha Iyengar Plumb) यांना यूएसच्या संरक्षण विभागाच्या खरेदी आणि देखभाल करण्यासाठी संरक्षण उपअवर सचिवपदी नियुक्ती झाली आहे. या प्रतिष्ठीत पदासाठी यूएसचे राष्ट्राध्यक्ष राष्ट्राध्यक्ष जो बायडन (US President Joe Biden) यांनी राधा अय्यंगार प्लंब यांना जून २०२२ मध्ये नामांकित केले होते. राधा अय्यंगार प्लंब हे सध्या संरक्षण उपसचिवच्या चीफ ऑफ स्टाफ म्हणून काम करत आहेत.

यूएस सिनेटने आवधिक प्रेस गॅलेरीने मंगळवारी ट्वीट करत म्हणाले, “६८-३० मताने, राधा अय्यंगार प्लंब यांना संरक्षण उपअवर सचिव म्हणून निवड झाली आहे.” यापूर्वी राधा अय्यंगार प्लंब यांनी फेसबुकवर पॉलिसी अॅनालिटसिसच्या जागतिक प्रमुख म्हणून काम पाहिले होते.

- Advertisement -

यापूर्वी राधा अय्यंगार यांनी गूगलमध्ये संचालक होत्या. गूगलमध्ये रिसर्च अ‍ॅन्ड इनसाइट्स, बिजनेस एनालिटिक्स, डेटा सायन्स टीमचे नेतृत्व केले होते. तसेच राधा अय्यंगार यांनी डिपार्टमेंट ऑफ डिफेन्स, एनर्जी मिनिस्ट्री आणि व्हाइट हाऊस नॅशनल सिक्युरिटी कौन्सिलमध्ये राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यांशी संबंधित अनेक वरिष्ठ पदांवर काम केले आहेत. राधा अय्यंगार यांनी मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून अर्थशास्त्रात पदवी आणि प्रिन्स्टन विद्यापीठातून अर्थशास्त्रात पीएचडी केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -