घरमहाराष्ट्रनागपूरएप्रिल महिन्याच्या अखेरीस पुन्हा अवकाळी पावसाची शक्यता; हवामान विभागाने अंदाज वर्तवला

एप्रिल महिन्याच्या अखेरीस पुन्हा अवकाळी पावसाची शक्यता; हवामान विभागाने अंदाज वर्तवला

Subscribe

नागपूर : महाराष्ट्रात अवकाळी पावसामुळे शेतकरी संकटात (Farmers in distress due to unseasonal rains) सापडला असतानाच हवामान विभागाकडून (IMD) पुन्हा अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवला आहे. अंदाजानुसार मध्य महाराष्ट्र (Madhya Maharashtra) आणि मराठवाड्यात (Marathwada) एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला.

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात कुठे कडक ऊन तर कुठे अवकाळी पावसामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. वारंवार होणाऱ्या वातावरणातील बदलामुळे एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातही कोकणातील तापमान कोरडे राहण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात येत्या 48 तासांत पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. मात्र, कोकणच्या (Konkan) उत्तरेकडील भागातील नागरिकांना उन्हाचा तडाखा सहन करावा लागणार आहे. यात कोकणासह, मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे भागातील तापमानाचा आकडा वाढणार आहे. तर किनापट्टी भागातील तापमना ३७ अंश किंवा त्यापेक्षाही अधिक होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

- Advertisement -

दरम्यान, विदर्भतील काही भागामध्ये गुरुवारी (20 एप्रिल) विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. यामुळे विदर्भातील काही भागांचा वीज पुरवठा खंडित झाला होता. नागपुरातील नरखेड तालुक्यात गारपीट झाल्याची माहिती मिळाली आहे. तसेच मुक्तापुर पेठ, खैरगाव, मदना, वडा उमरी, जलालखेडा, खडकी आणि देवग्राम या भागात गारपीट झाल्याने संत्र आणि मोसंबी या फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सांगलीतील मिरज भाग आणि पुणे येथे देखील अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. पुण्यातील सिंहगड रोड, कोथरूड, वारजे परिसरात देखील गारपीट झाल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.

विदर्भातील तापमानता कमालीची वाढ
मे महिना सुरू झाला नसला तरीही विदर्भाच्या बहुतांश भागातील तापमानात वाढ झालेली आहे. तर सोलापूर जिल्ह्यातील तापमानाने उच्चांक काढला आहे. सोलापुरात गुरुवारी ४२.२ अंश सेल्सिअस ऐवढ्या तापमानाची नोंद झाल्याची माहिती मिळाली आहे. मालेगाव आणि साताऱ्याची परिस्थिती फार वेगळी नाही. साताऱ्यातील तापमान ४० अंशापर्यंत पोहोचला आहे. यामुळे नागरिकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -