घरमहाराष्ट्रअक्षय्य तृतीयाच्या मुहूर्तावर आंब्याच्या मागणीत वाढ; ग्राहकांची मोठी गर्दी

अक्षय्य तृतीयाच्या मुहूर्तावर आंब्याच्या मागणीत वाढ; ग्राहकांची मोठी गर्दी

Subscribe

अक्षय्य तृतीयाच्या मुहूर्तावर आंब्याला मोठी मागणी आहे. त्यामुळे आज, शनिवारी सकाळपासूनच नवी मुंबईच्या एपीएमसी फळ मार्केटमध्ये लोकांची गर्दी पाहायला मिळत आहे. अक्षय्य तृतीया बरोबर रमजान ईदही आल्याने आंबा खरेदीत वाढ झाली आहे.

भारतीय संस्कृतीतील साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणजे अक्षय्य तृतीया. या तिथीवर केलेल्या कोणत्याही कार्याचा कधीही क्षय होत नाही म्हणून ती अक्षय्य मानली जाते. या दिवसांपासून अनेक घरांमध्ये आंब्याचं सेवन केलं जातं. त्यामुळे अक्षय्य तृतीयाच्या मुहूर्तावर आंब्याला मोठी मागणी आहे. त्यामुळे आज, शनिवारी सकाळपासूनच नवी मुंबईच्या एपीएमसी फळ मार्केटमध्ये लोकांची गर्दी पाहायला मिळत आहे. अक्षय्य तृतीया बरोबर रमजान ईदही आल्याने आंबा खरेदीत वाढ झाली आहे.( Increase in demand for mangoes on the occasion of Akshaya Tritiya A large crowd of customers )

अक्षय्य तृतीयाचा शुभ मुहूर्त असल्याने लोकांकडून आंबा खरेदीला महत्त्व दिलं जात आहे. आंबा घेण्यासाठी सकाळीच लोक फळ मार्केटमध्ये आले आहेत. मार्केटमध्ये मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. मात्र, सध्या आंबा महाग मिळत आहे. सध्या एपीएमसीमध्ये 60 ते 65 हजार आंबा पेटी येत आहे. यामध्ये कोकणातील हापुसच्या फक्त 15 ते 18 हजार पेट्या येत आहेत. राहिलेला आंबा दक्षिण भारतातून आवक होत आहे. कोकणातील हापूस कमी येत असल्यानं दरही वाढले आहेत. सध्या 500 ते 800 रुपये डझन हापूस आंबा विकला जात आहे.

- Advertisement -

….म्हणून आंब्यांची खरेदी

आंबे खूप महाग आहेत. 600 ते 700 रुपये डझन आंबे मिळत आहेत. आज, ईद आणि अक्षय्य तृतीया आहे. त्यामुळे आम्ही आंबे खरेजदी करण्यासाठी आलो असल्याची माहिती ग्राहकांनी दिली. आज अक्षय्य तृतीया आणि रमजान ईद हे दोन्ही सण एकाच वेळी आल्याने बाजारात मोठी मागणी असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. कोकणातून सध्या कमी आंबा बाजारात आला आहे. लोकांची हापूस आंब्याला जास्त मागणी असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.

( हेही वाचा: 2024 ला शिंदे गटाचा पराभव झाला तर, निवडणूक आयोग आम्हाला शिवसेना देणार का? – संजय राऊत )

- Advertisement -

अवकाळी पाऊस, गारपीटीचा फटका

सध्या राज्यात अवकाळी पाऊ, आणि गारपीट होत आहे. कुठे थंडी तर कुढे गरम होताना दिसत आहे. त्याचा फटका आंब्यांना देखील बसला आहे. देशातील ओडिशा, उत्तर प्रदेश महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये आंबा पिकांची नासाडी झाली आहे. त्यामुळे आंबा उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. यावर्षी उत्पादनातही घट झाली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -