घरमनोरंजनजिया खान आत्महत्याप्रकरणी सूरज पांचोलीची निर्दोष सुटका

जिया खान आत्महत्याप्रकरणी सूरज पांचोलीची निर्दोष सुटका

Subscribe

बॉलिवूड अभिनेत्री जिया खानच्या मृत्यूप्रकरणी विशेष सीबीआय कोर्टाचा निर्णय आला आहे. या प्रकरणात न्यायालयाने मुख्य आरोपी आणि सूरज पांचोलीची निर्दोष सुटका केली आहे. सूरज पांचोली त्याची आई जरीना वहाबसोबत सीबीआय कोर्टात पोहोचला होता. दहा वर्षांनंतर सूरज पांचोलीला या प्रकरणात दिलासा मिळाला आहे.

3 जून 2013 मध्ये वयाच्या 25 व्या वर्षी जिया खानने जुहू येथील फ्लॅटमध्ये आत्महत्या केली होती. या प्रकरणी जियाचा बॉयफ्रेंड सूरज पांचोलीवर तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप करण्यात आला. त्यामुळे आरोपी म्हणून सूरलजा अटकत करण्यात आली होती. मात्र, नंतर त्याला जामीन मिळाला होता. याप्रकरणी जियाची आई राबिया खान गेल्या दहा वर्षांपासून आपल्या मुलीला न्याय देण्याची मागणी करत आहे.

- Advertisement -

जिया खानचा पोस्टमार्टम रिपोर्ट

जिया खानच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये डॉक्टरांनी सांगितले होते की, जियाचा मृत्यू गुदमरल्यामुळे झाला आहे. जियाची आई राबिया खान यांनी सूरज पांचोलीवर सर्व आरोप केले आणि गेली दहा वर्षे ती आपल्या मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी न्यायालयात लढा देत होती.

21 जून 2013 रोजी सूरज पांचोलीचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला. त्यानंतर अखेर 1 जुलै 2013 रोजी या अभिनेत्याची जामिनावर सुटका झाली होती. दरम्यान, त्यानंतर 2021 मध्ये जिया खान आत्महत्या प्रकरण विशेष सीबीआय न्यायालयात वर्ग करण्यात आले. या प्रकरणाचा तपास 20 एप्रिल 2023 रोजी पूर्ण झाला. न्यायमूर्ती एएस सय्यद यांनी निकाल राखून ठेवला होता. आज न्यायालयाने सूरज पांचोलीची या प्रकरणातून निर्दोष सुटका करण्याचे जाहिर केले.

- Advertisement -

निकालानंतर सूरजची प्रतिक्रिया

या निकालाचे 10 वर्ष माझ्यासाठी खूप वेदनादायक होते. पण आज मी केवळ माझ्याविरुद्धचा हा खटला जिंकला नाही तर माझा सन्मान आणि आत्मविश्वासही परत मिळवला आहे, अशा घृणास्पद आरोपांसह जगाला सामोरे जाण्यासाठी खूप धैर्य हवे होते. मी आशा करतो आणि देवाला प्रार्थना करतो की एवढ्या लहान वयात मी ज्या गोष्टीतून गेलो ते कोणीही करू नये, मला माहित नाही की माझ्या आयुष्यातील ही 10 वर्षे मला कोण परत देईल, परंतु मला आनंद आहे की हे शेवटी मला यश मिळाले फक्त माझ्यासाठीच नाही तर खास माझ्या कुटुंबासाठी हा आनंदाचा क्षण आहे. असं सूरज म्हणाला.


हेही वाचा :

‘द केरळ स्टोरी’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -