घरमनोरंजन'द केरळ स्टोरी' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

‘द केरळ स्टोरी’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

Subscribe

निर्माता विपुल अमृतलाल आणि सुदीप्तो सेन यांच्या ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात केरळमधील 32,000 महिलांच्या अचानक बेपत्ता झाल्याची कथा आहे. ISIS ही दहशतवादी संघटना या महिलांचे ब्रेनवॉश करते आणि त्यांना भारतात वेगवेगळ्या दहशतवादी मोहिमा पार पाडण्यासाठी प्रशिक्षण देऊन मिशनवर पाठवते.

अभिनेत्री अदा शर्मा या चित्रपटात मुख्य भूमिका साकारत आहे. नुकतेच तिने या चित्रपटाचे ट्रेलर सोशल मीडियावर शेअर करत लिहिलंय की, केरळमधील हजारो निष्पाप मुलींचे ब्रेनवॉश, धर्मांतर करण्यात आले आणि त्यांचे जीवन नष्ट झाले. ही कथा या चित्रपटाची आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Adah Sharma (@adah_ki_adah)

- Advertisement -

अदा शर्मा या चित्रपटात हिंदू मल्याळी नर्सची भूमिका साकारत आहे. या चित्रपटात ती आणि तिच्यासोबतच्या काही नर्स केरळमधून अचानक गायब झाल्या. त्यात त्यांना जबरदस्ती इस्लाम धर्म स्वीकारण्यास भाग पाडले जाते. त्यानंतर त्यांना ISIS ही दहशतवादी संघटनेत सामील केले जाते.

दरम्यान, या चित्रपटात अदा शर्माशिवाय योगिता बिहानी, सोनिया बालानी आणि सिद्धी इदनानी या अभिनेत्री महत्त्वाची भूमिका साकारताना दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन सुदीप्तो सेनने केलं असून विपुल अमृतलालने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. हा चित्रपट 5 मे रोजी प्रदर्शित होणार आहे.

- Advertisement -

 


हेही वाचा :

‘पोन्नियिन सेल्वन 2’ ठरणार USमध्ये सर्वाधिक कमाई करणार तिसरा तमिळ चित्रपट

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -