घरमहाराष्ट्रनाशिकनाशिक-पिंपळगाव बाजार समिती मतमोजणी दरम्यान तुफान राडा; 'हे' दोन गट आमने-सामने

नाशिक-पिंपळगाव बाजार समिती मतमोजणी दरम्यान तुफान राडा; ‘हे’ दोन गट आमने-सामने

Subscribe

नाशिक-पिंपळगाव बाजारसमितीत मतमोजणी दरम्यान तुफान राडा झाला आहे. अपक्ष उमेदवार यतिन कदम आणि माजी आमदार अनिल कदम आमने- सामने आले. दोन्ही नेते आमने-सामने आल्याने हा राडा झाल्याचं म्हटलं जात आहे.

राज्यभराती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचे निकाल हाती येत आहेत. काही ठिकाणी अजूनही मतमोजणी सुरु आहे. अशातच एक मोठी बातमी समोर आली आहे. नाशिक-पिंपळगाव बाजारसमितीत मतमोजणी दरम्यान तुफान राडा झाला आहे. अपक्ष उमेदवार यतिन कदम आणि माजी आमदार अनिल कदम आमने- सामने आले. दोन्ही नेते आमने-सामने आल्याने हा राडा झाल्याचं म्हटलं जात आहे. गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज करण्यात आल्याचंही वृत्त आहे. ( APMC Election 2023 Result  Nashik Pimpalgaon Market Committee there storm Independent candidate Yatin Kadam and former MLA Anil Kadam  )

नाशिक-पिंपळगाव बाजारसमितीतील मतदान केंद्रावर प्रचंड गोंधळ आहे. यतिन कदम आणि माजी आमदार अनिल कदम हे आमने सामने आले. त्यानंतर दोन्ही बाजूंचे कार्यकर्ते एकमेंकावर धावून आले. त्यानंतर या मतदान केंद्रात गोंधळ झाला. या मतदान केंद्रावर पोलीसांचा मोठा बंदोबस्त होता. तरीदेखील येथे मोठ्या प्रमाणात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे आता या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर अतिरिक्त पोलिसांच बळदेखील पिंपळगाव केंद्रात दाखल करण्यात आलं आहे.

- Advertisement -

परिस्थिती नियंत्रणात 

हे मतदान केंद्र संवेदनशील आहे. त्यामुळे इथे गोंधळ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. दरम्यान, हा राडा झाल्याने पोलिसांनी जमावावर सौम्य लाठीचार्ज करत परिस्थिती नियंत्रणात आणली. मतमोजणीला सुरुवात झाली आणि महाविकास आघाडीचे उमेदवार दिलीप बनकर यांच्या पॅनलने आघाडी घ्यायला सुरुवात केली. त्यानंतर यतिन कदम हे विजयाच्या जवळ आले आणि त्यानंतर ही बाचाबाची सुरु झाल्याचे सांगितले जात आहे.

( हेही वाचा: केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांचा पुन्हा एकदा मुंबई दौरा, राजकीय चर्चांणा उधाण )

- Advertisement -

कृषी उत्पन्न समितीचा निकाल

  • बारामतीत राष्ट्रवादीने गड राखला आहे, राष्ट्रवादीचे 17 उमेदवार आघाडीवर आहेत.
  • अंबाजोगाई बाजार समितीवर धनंजय मुंडे यांचं वर्चस्व, तर पंकजा मुंडे यांना धक्का
  • अंबाजोगाई बाजार समितीच्या 18 पैकी 15 जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -