घरदेश-विदेशLive Update : हुतात्मा स्मारकाला काल रात्री सजावट देखील केलेली नव्हती -...

Live Update : हुतात्मा स्मारकाला काल रात्री सजावट देखील केलेली नव्हती – उद्धव ठाकरे

Subscribe

हुतात्मा स्मारकाला काल रात्री सजावट देखील केलेली नव्हती – उद्धव ठाकरे

– दुर्मूखलेले मुख्यमंत्री आज तिथे जाऊन आले असतील.
– माझ्या खेरीज कोणीच मोठा होता कामा नये
– मोरारजी देसाई नावाचा नरराक्षस दिल्लीत बसला होता. मुंबईत त्याने गोळीबार करण्याचा आदेश दिला होता.
– मुंबईसाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करणाऱ्या महिलांची किंचितही जिद्द मिंध्यांमध्ये नाही.
– कर्नाटकची निवडणूक रंगात आली आहे.
– भोकं पडलेली टिनपाटं ज्या भाषेत बोलत आहेत. त्या भाषेत अजून शिवसैनिक बोलले नाहीत. त्या भोकं पडलेल्या टिनपाटांना बुचं घालं नाही, तर आम्हीही बोलायला सुरुवात करु.
– तीन निवडणुकांत महाविकास आघाडीची वज्रमूठ महाराष्ट्राने पाहिली आहे.
– बारसूचा मुद्दा तिथे जाऊन तिथल्या लोकांसोबत जाऊन बोलणार.
– माझं पत्र नाचवतात. पण त्यात लिहिलं आहे का की गोळ्या घालून बारसूत रिफायनरी करा.
– जे बाळासाहेबांना भेटले नव्हते ते, मला बाळासाहेब शिकवायला चालले आहे.
– मविआचे सरकार गेल्याबरोबर सोन्यासारखी बीकेसीची जागा बुलेट ट्रेनच्या घशात घातली.
– बुलेट ट्रेन कोणासाठी केली जात आहे. किती मराठी माणसं रोज अहमदाबादला जाणार आहे?
– मेट्रो कारशेड आरे ऐवजी कांजूर येथे करत होतो. मात्र केंद्र सरकारने ती जागा अडवली. आता आमचं सरकार गेल्यानंतर कांजूरलाही कारशेड करण्याचा प्रस्ताव यांनी तयार केला आहे.
– भाजपची वृत्ती ही भांडवलदारी वृत्ती आहे. मुंबईला ओरबाडण्याचा प्रयत्न चालू आहे.
– मुंबई तोडता येत नाही, म्हणून मुंबई मारुन टाकायची ही यांची भांडवलदारी वृत्ती आहे.
– मुंबईवरुन सर्वाधिक महसूल येतो त्यामुळे मुंबईचं महत्त्व कमी करण्याचे काम सुरु आहे.
– शिवाजी महाराजांनी इंग्रजांच्या वखारी लुटण्यासाठी सूरत लुटले होते. आता
– तुमच्या धमन्यांमध्ये बाळासाहेबांचे विचार एक कणही शिल्लक असता तर शिवसेनेशी गद्दारी केलीच नसती.
– महाविकास आघाडीचे सरकार असताना महाराष्ट्रात मराठी भाषा सक्तीची केली होती. हा निर्णय यांनी फिरवला आहे. कुठे आहे बाळासाहेबांचे विचार?
– आम्ही पंतप्रधानांची भेट घेऊन ११ मागण्या केल्या होत्या. त्यात कांजूरची जागा आणि मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची मागणी केली होती.
– स्वतःला हिंदूह्रदयसम्राट होता येत नाही तेव्हा बाळासाहेबांचेही महत्त्व कमी करण्याचे काम यांनी सुरु केले आहे. म्हणे बाबरीत शिवसैनिक नव्हते.
– काँग्रेस, राष्ट्रवादी यांना सत्ता कशी चालवायची, कारभार कसा करायचा याचा अनुभव आहे.
– लोकांची संमती मिळाली तरच बारसूत रिफायनरी करण्याचे आम्ही आश्वासन दिले होते.
– लोकांना जातीय, धार्मिक दंगलीत गुंतवून ठेवायचे आणि निवडणुका आल्या की आणखी एक थाप मारायची, निवडणुका जिंकायच्या हेच काम यांचे सुरु आहे.
– अदानींची चौकशी झाली पाहिजे की नाही, तुम्हाला काय वाटतं? माझं मत आहे की त्यांची चौकशी करु नका. त्यांचे आत्मचरित्र शालेय मुलांच्या पुस्तकात लावा, श्रीमंत कसे व्हायचे? आम्हाला अडाणी नाही तर अदानी व्हायचे आहे, हे मुलांना शिकवा.
– सत्यपाल मलिक यांनी पुलवामामध्ये काय झाले ते सांगितले. आता एक-एक गोष्ट बाहेर येत आहे.
– सत्यपाल यांनी राज्यपाल असतानाच सांगितलं होतं. पण तेव्हा पंतप्रधान जिम कॉर्बेट मधून बाहेर आले आणि म्हणाले, यावर आताच काही बोलू नका. मग राज्यपाल मलिक कसे काय बोलू शकतील?
– कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा? हे आता भाजपला विचारा.
– स्वतःचा काही आदर्श यांच्याकडे नाही, म्हणून आमचा बाप चोरता,

- Advertisement -

येत्या 6 मेला उद्धव ठाकरे बारसूला जाणार


घोटाळा करुन मुख्यमंत्री झालेल्या मुख्यमंत्र्यांना त्यांची जागा दाखवण्याची वेळ आली – अजित पवार

- Advertisement -

– मुंबईचं मराठीपण टिकवण्यामध्ये आणि मुंबईचा मान-सन्मान वाढवण्याचे काम बाळासाहेब ठाकरे यांनी केले. मुंबईत मराठी माणूस टिकवून ठेवण्याचे काम त्यांनी केले हे आपल्याला नाकारुन चालणार नाही.
– हे सरकार आल्यापासून विधान परिषद, विधानसभा पोटनिवडणूक, बाजार समितीच्या निवडणुका यात महाविकास आघाडीला जनतेने मोठे यश दिले आहे.
– ३१ मार्चची १ लाख ८ हजार कोटींची बीलं या सरकारने थांबवले आहे. हे का घडत आहे.
– महाराष्ट्रात अवकाळी पाऊस पडत आहे. शेतकऱ्यांच्या बागा, उन्हाळी पिके उद्धवस्त झाली आहे. त्यांना मदत करण्याचे काम हे सरकार करत नाही.
– राज्यात कायदा आणि सुव्यवस्था बिघडली आहे. काल-परवा मुंबईत काय-काय घडलं. कोयता गँग धुमाकूळ घालत आहे.
– काळ्याआईची सेवा करणाऱ्या शेतकऱ्याला आधार देण्याचे काम आपल्याला करावे लागणार आहे.
– महापालिका, नगर पालिका, पंचायतीच्या निवडणुका का जाहीर करत नाही. यांच्या मनात भीती आहे, की जनता काय करेल, याचा यांना भरवसा नाही.
– जाहिरातबाजी जोरात चालू आहे. हे दगाफटका करुन सत्तेवर आलेले सरकार आहे. गद्दारी करुन सत्तेवर आलेलं सरकार आहे. शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राचा हा इतिहास नाही.
– फक्त सर्वसामान्यांचं सरकार असल्याचं सांगितलं जातं मात्र महागाई कमी करायला तयार नाही.
– देशातल्या कोणत्याच सरकारला सुप्रीम कोर्टाने नंपुसक सरकार म्हटलेले नव्हते. या सरकारला कोर्टाने नंपुसक सरकार म्हटले. हा महाराष्ट्राचा अपमान नाही?
– मुंबईत साडेतीनेश पन्नास किलोमीटर रेल्वे लाईन टाकल्याचे मुख्यमंत्री सांगत आहेत.
– घोटाळा करुन मुख्यमंत्री झालेल्या मुख्यमंत्र्यांना त्यांची जागा दाखवण्याची वेळ आली आहे.
– कोणीही उठतो, कोणत्याही विषयावर बोलतो.
– टिल्ली, टिल्ली लोकं कॅमेऱ्यासमोर येऊन काहीही बोलायला लागले आहेत. ते दाखवण्याचीही लाज चॅनलला वाटत आहे.
– बदल्यांचे दर ठरले आहेत. असे भ्रष्टाचारी सरकार महाराष्ट्राने याआधी कधीही पाहिले नव्हते.
– जाती, धर्मामध्ये भेद निर्माण करण्याचे काम भाजपचे सरकार करत आहे.


तिन्ही पक्ष एकत्र आल्यामुळे महाराष्ट्रात हॅट्रिक साधली – अशोक चव्हाण

– आता षट्कार मारायचा आहे महापालिकांच्या निवडणुकीत.
– नुकत्याच झालेल्या निवडणुकांतून जनतेचा कौल स्पष्ट झाला आहे. आयाराम-गयाराम लोक निवडून द्यायला तयार नाही.
– दिवारमधील एक डायलॉग आठवतो… मेरे पास बंगला है, गाडी है, तुम्हारे पास क्या है.. तर आमच्याकडे जनतेचा विश्वास आहे. आमच्याकडे उद्धव ठाकरे आहेत. अजितदादा आहेत. नाना पटोले आहेत.
– आता सगळीकडे चर्चा आहे डबल इंजिनचे सरकार आहे.
– येणाऱ्या महापालिकेत आपण तिघांचं एकच इंजिन महापालिका जिंकून दाखवू.
– भाजपने घेतलेले निर्णय हे देशाच्या हिताचे आहेत का?
– काँग्रेस-राष्ट्रवादी आणि त्यानंतर उद्धव ठाकरेंच्या काळात शिवसेनेने घेतलेल्या निर्णयांनी मुंबईत चांगले काम झाले.
– महापालिकेत ९२ हजार कोटींची गुतंवणूक करण्यात आली आहे.
– ट्रिपल इंजिनला रेड सिग्नल देण्याची गरज आहे.
– कर्नाटकात भाजपचे डबल इंजिन केव्हाच रुळावरुन खाली उतरलं आहे, फक्त पलटी होण्याचे बाकी राहिले आहे.
– सत्तेत येणं किंवा न येणं हे जनतेच्या हातात असते. आम्ही कधीही जोडतोड करुन सरकार स्थापन केलं नाही.
– महिविकास आघाडीची सत्ता गेल्यानंतरही लोक हलले नाहीत.
– राहुल गांधी यांनी वास्तव लोकांसमोर मांडेल. ते नोटबंदी, जीएसटीवर बोलले. अदानींवर बोलले. म्हणून त्यांची खासदारकी रद्द केली. त्यांना घर सोडायला लावले.
– अशा पद्धतीने विरोधकांना संपवण्याचे कारस्थान केले जात आहे. सत्ता येते आणि जाते, मात्र अशा पद्धतीचे कारस्थान आम्ही कधीही केले नाही.
– महाराष्ट्रात गारपीट झाल्यानंतर शेतकऱ्यांना ३०० रुपयांचा विम्याचा चेक येत आहे. हे बेभान सरकार आहे.


केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, आणि राज्य सरकारने खारघरमध्ये सामूहिक हत्याकांड केले – नाना पटोले

– आज कामगार दिवस आहे. कामगारांच्या मेहनतीला नमन करण्याचा दिवस आहे.
– वज्रमूठ सभा जेव्हाजेव्हा येते तेव्हा शिंदे-फडणवीसांच्या मनात भीती निर्माण होते.
– भाजप हे शतेकरी, गरीब आणि मध्यमवर्गाच्या विरोधातील पक्ष आहे. काल परवा आलेला बाजार समितीचा निकाल त्याचमुळे सत्ताधाऱ्यांच्याविरोधात आला. या निमित्ताने जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली आहे.
– महापालिका, जिल्हा परिषद या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका रोखून धरण्यात आल्या आहेत. हे लोकशाहीला संपवण्याची प्रक्रिया आहे.
– या निवडणुका झाल्या तर शिंदे गट आणि भाजपचा पराभव नक्की आहे, त्याच भीतीने ते निवडणुका घेण्याचे टाळत आहेत.
– केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, आणि राज्य सरकारने खारघरमध्ये सामूहिक हत्याकांड केले आहे. त्यासाठी आम्ही विधानसभेचे दोन दिवसांचे विशेष अधिवेशन घेण्याची मागणी केली आहे. मात्र हे सरकार अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्यावर दोषारोप करत आहेत.
– लोक उन्हात तडफडून मरत होते, तरीही यांनी खारघरमधील कार्यक्रम सुरु ठेवला. गृहखातं फडणवीसांकडे आहे. त्यांना सर्व माहित होतं मात्र ते मेजवाण्या घेत होते. आणि तिकडे लोक तडफडून मरत होते.
– इंग्रजांनाही लाजवेल असे पाप भाजपचे लोक करत आहेत.
– रत्नागिरीतील बारसूमध्ये रिफायनरीचा वाद सुरु आहे. कोकणातील पर्यावरणाला यामुळे बाधा होणार आहे. कोकणातील पर्यावरण हे प्रत्येकाला रिचार्ज करणारं आहे.
– विकासाच्या नावाने कोकण उद्धवस्त करण्याचे कारस्थान रचले जात आहेत.
– ब्लॅक मनी व्हाईट करण्यासाठी यांना कोकणात रिफायनरी आणायची आहे.
– त्यासाठी महिलांवर लाठीचार्ज करण्यात आला.
– हे सरकार आल्यापासून राज्यात अवकाळी पाऊस सुरु झाला आहे. गारपिट सुरु झाली आहे. त्या शेतकऱ्यांना हे सरकार मदत करायला तयार नाही.
– ७५ नोकऱ्या देण्याचे पोकळ आश्वासन शिंदे-फडणवीस सरकार देत आहे. हे ७५ हजार लोक आऊट सोर्सिंगच्या माध्यमातून भरले जाणार आहे. त्याचे आऊट सोर्सिंग हे भाजपच्या बगलबच्च्यांना दिले जाणार आहे. त्यासाठी जनतेच्या घामाचा पैसा वापरला जाणार आहे.
– मन की बातसाठी देशभर इव्हेंट करण्यात आली. जिथे जिथे भाजपचे सरकार आहे तिथे मोठमोठे इव्हेंट करण्यात आले. जनतेच्या पैशांची ही लयलूट या सरकारने चालवली आहे.
– लोकशाही संपवण्यासाठी या सरकारचा अटापिटा सुरु आहे.
– काँग्रेस ही महाविकास आघाडीबरोबर आहे. देशात आणि राज्यात असलेल्या तानाशाही सरकारला बाहेर खेचल्याशिवाय आम्ही राहाणार नाही.


असंविधानिक, घटनाबाह्य हे या सरकारसाठी फार सौम्य शब्द आहेत – भाई जगताप- संभाजीनगरमधून सुरु झालेली वज्रमूठ सभेला रोखण्याचा सरकारने खूप प्रयत्न केले मात्र हे घटनाबाह्य गद्दारांचे सरकार जनतेला रोखू शकले नाही. नागपुरमधील सभा संभाजीनगरच्याही दोन पाऊले पुढे होती.
– आज मुंबईतील वज्रमूठ ही नागपूर सभेपेक्षाही मोठी आहे.
– शिवसेनेने २५ वर्षे ज्यांच्यासोबत सोयरिक केली त्यांनीच खंजिर खुपसला.
– बोक्यांचं लक्ष्य शिक्यावर.. या बोक्यांचं लक्षं महापालिकेच्या ९० हजार कोटींच्या ठेवीवर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ते बोलून दाखवलं आहे.
– सर्वसामान्यांच्या पैशांवर डोळा ठेवला तर मुंबईतील जनता त्यांना त्यांचे सडेतोड उत्तर दिला जाईल.
– महाराष्ट्र भूषण पुरस्कार कार्यक्रमात किती लोकांचे मृत्यू झाले याची माहिती दिली गेली पाहिजे. यासाठी चौकशीची मागणी आम्ही केली आहे.
– महाविकास आघाडीत बिघाडीची कितीही स्वप्न पाहिली तरी ती पूर्ण होणार नाही.
– शिंदे गट आणि भाजपच्या राक्षसांना मुंबईतून पळवून लावण्याची तयारी आम्ही ठेवलेली आहे.
– जगातील सर्व क्रांती या कामगारांनी घडवल्या आहेत. फ्रेंच क्रांतीपासून संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यापर्यंत कामगारांनी लढा दिला होता.

उद्धव ठाकरे मविआच्या वज्रमुळ सभास्थळी दाखल


३०-३५ वर्षे रखडलेला बीडीडीचा प्रकल्प आम्ही सुरु केला असल्याचं प्रतिपादन जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे.

३०-३५ वर्षे रखडलेला बीडीडीचा प्रकल्प आम्ही सुरु केला

आता कुणाविरुद्ध काही बोलायचं राहिलचं नाही

बोललं की आत टाकलं जातं

परिस्थितीविरुद्ध लढणं हाच खरा विद्रोह असतो

पुण्यातल्या रॅप साँगरवर कारवाई करुन अन्याय केला

तुम्ही पन्नास खोके घेतलं पण महाराष्ट्राला काय मिळालं

महाराष्ट्रात महाविकास आघाडी एकत्र राहिली तर कुणाचा बाप रोखू शकणार नाही


गेल्या ९-१० महिन्यात महाराष्ट्र अंधकारात गेला आहे – आदित्य ठाकरे

महाराष्ट्राला पुन्हा एकदा सुवर्णकाळाकडे घेऊन जायचे आहे.

– महाविकास आघाडीच्या काळात साडे सहा लाख कोटींची गुतवणूक महाराष्ट्रात आणली गेली आहे.- सध्याचं सरकार हे बिल्डर आणि कंत्राटदारांचे सरकार आहे. यात एकही मुंबईकर नाही.

– महाविकास आघाडीच्या काळात शेतकऱ्यांना कर्जमुक्ती दिली. आजही शेतकरी सांगतात, आम्हाला सरकारची मदत मिळाली.

– आता अवकाळी सरकार बसलं आहे. त्यांना अवकाळी पावसाची पर्वा नाही. शेतकऱ्यांच्या दुःखांशी त्यांना काहीही देणेघेणे नाही.

– महिलांबाबत अपशब्द वापरणारे आजही सरकारमध्ये मंत्री म्हणून काम करत आहेत.

– महाराष्ट्रात मुख्यमंत्री नसल्यासारखा कारभार चालला आहे. हे राज्य अंधकारात गेले आहे. त्याला अंधकारातून बाहेर काढायचे आहे.

वांद्र्यातील वज्रमुठ सभास्थळी महाविकास आघाडीचे नेतेमंडळी उपस्थित


मोहित कंबोज यांच्या विरोधात सचिन कांबळे पोलिसात तक्रार दाखल करणार


नवाब मलिकांना दिलासा नाहीच; जामिनावर सुनावणी मंगळवारी


ई-शिवनेरी बस प्रवाशांच्या सेवेत- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


मुंबई- गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी


भिवंडी दुर्घटनेतील मृतांच्या संख्येत वाढ; 8 जणांचा मृ्त्यू


1 मे 2023 रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त शिवाजी पार्क येथे परेड संचलन कार्यक्रम आयोजित केला आहे. नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून सकाळी 6 ते दुपारी 12 या वेळेत शिवाजी पार्क परिसराकडे जाणारी वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे.


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हुतात्म्यांना केलं अभिवादन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हुतात्मा चौकात जाऊन हुतात्म्यांना अभिवादन केलं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -