घरदेश-विदेशजगाच्या आर्थिक वृद्धीत भारत, चीनचे योगदान

जगाच्या आर्थिक वृद्धीत भारत, चीनचे योगदान

Subscribe

२०२३ मध्ये आशिया खंडाचा वृद्धीदर ४.६, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा अंदाज

पुढील वर्षभरात आशिया-पॅसिफिक क्षेत्राचा आर्थिक वृद्धीदर सकारात्मकरित्या वाढणार आहे. २०२२ मध्ये आशिया-पॅसिफिक क्षेत्राचा आर्थिक वृद्धीदर ३.८ टक्के होता. तो २०२३ मध्ये वाढून ४.६ टक्के होणार आहे, असे संकेत आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (आयएमएफ)ने दिले आहेत. भारत आणि चीनची अर्थव्यवस्था वेगाने भरारी घेत आहे. त्यामुळे या आर्थिक वृद्धीत भारत आणि चीन या दोन देशांचे मोठे योगदान राहणार आहे. एवढेच नाही, तर जगाच्या एकूण आर्थिक वृद्धीत आशिया-पॅसिफिक क्षेत्राचे ७० टक्के योगदान असणार आहे, असेही आयएमएफने स्पष्ट केले आहे.

आयएमएफने मंगळवारी रिजनल इकॉनॉमिक आउटलेट-एशिया अँड पॅसिफिक अहवाल प्रसिद्ध केला. त्यामध्ये जागतिक आर्थिक वृद्धीदरात भारत आणि चीन या दोन्ही देशांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे, असे नमूद करण्यात आले आहे. आशिया-पॅसिफिक क्षेत्रात भारत आणि चीन जगातील एकूण योगदानापैकी ५० टक्के योगदान देतील. कोरोनानंतर चीनने आपली अर्थव्यवस्था पूर्णपणे खुली केल्याने त्याचा प्रभाव विकासाच्या गतीवरही पडेल, असे म्हटले आहे.

- Advertisement -

अमेरिकेतील बँका डबघाईला
२०२३ वर्ष हे जगासाठी आव्हानात्मक ठरणार आहे. अमेरिका आणि युरोपमध्ये आर्थिक मंदीची परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे विकासदर खाली येण्याची दाट शक्यता आहे. वाढलेले व्याजदर आणि रशिया-युक्रेन युद्धाचा परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेवर होत आहे, अशी भीती अहवालात व्यक्त करण्यात आली आहे. स्टार्टअपला प्रोत्साहन देणारी सिलिकॉन व्हॅली बँकेनेही हात टेकले आहेत, तर सोमवारी फर्स्ट रिपब्लिकन बँकेलाही टाळे लागले आहेत. या घटनांमुळे अमेरिकेतील आर्थिक संकट अजून गडद होत चालले आहे, असेही अहवालात नमूद करण्यात आले आहे. अमेरिकेतील काही बँका डबघाईला आल्याने जागतिक बँक उद्योग चिंतेत आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -