घरमहाराष्ट्रआता कोणी 'हिंदुत्ववादी सरकार'च्या राज्यातील महाराष्ट्र स्टोरी बनवेल का? काँग्रेसचा सवाल

आता कोणी ‘हिंदुत्ववादी सरकार’च्या राज्यातील महाराष्ट्र स्टोरी बनवेल का? काँग्रेसचा सवाल

Subscribe

सचिन सावंत यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे की, आता राज्यातील हे हिंदुत्ववादी सरकार महाराष्ट्रातील या मुली बेपत्ता होण्याच्या आकडेवारीवरुन 'महाराष्ट्र स्टोरी' बनवणार का? असा सवाल करत सरकारवर टीका केली आहे.

राज्यात बेपत्ता मुलींच्या आकडेवारीत वाढ होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मार्च महिन्यात राज्यातील तब्बल 2 हजार 200 मुली बेपत्ता झाल्याचं आकडेवारीतून स्पष्ट झालं आहे. समोर आलेल्या या आकडेवारीनंतर आता राज्यातील विरोधी पक्षांनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. ( Congress leader Sachin sawant criticised Shinde Fadnavis government over missing 70 girls per day )

काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी एक ट्वीट करत सरकारवर टीका केली आहे. सचिन सावंत यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे की, आता राज्यातील हे हिंदुत्ववादी सरकार महाराष्ट्रातील या मुली बेपत्ता होण्याच्या आकडेवारीवरुन ‘महाराष्ट्र स्टोरी’ बनवणार का? असा सवाल करत सरकारवर टीका केली आहे.

- Advertisement -

मागच्या काही दिवसांपासून सत्य घटनेवर आधारित द केरला स्टोरी हा चित्रपट चर्चेचा विषय बनला आहे. हा चित्रपट आता प्रदर्शित झाला असून, त्यावरुन अनेक राजकीय पक्ष आपल्या भूमिका मांडत आहेत. त्याचाच दाखल देत काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी आता महाराष्ट्र स्टोरी बनवणार का? असा सवाल केला आहे.

मार्च महिन्यात राज्यातून 2200 मुली बेपत्ता झाल्या आहेत, त्याआधी फेब्रुवारी महिन्यात ही संख्या 1810 इतकी होती. त्यामुळे एकाच महिन्यात बेपत्ता होणाऱ्या मुलींच्या संख्येत 390 ने वाढ झाल्याचं स्पष्ट झालं आहे. नोकरी, लग्न, प्रेमाचं आमिष दाखवून मुलींची दिशाभूल केली जात असून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केले जात आहेत. काही पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रेम प्रकरणातून किंवा वेगवेगळ्या आमिषाला बळी पडून आणि घर सोडून जाणाऱ्या मुलींचे प्रमाण जास्त आहे.

- Advertisement -

शहरी भागापेक्षा ग्रामीण भागामध्ये मुली बेपत्ता होण्याचं प्रमाण जास्त असल्याचं समोर आलं आहे. पुणे, नाशिक, अहमदनगर आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये हे प्रमाण अधिक आहे. मार्च महिन्याची आकडेवारी पाहता, पुण्यातून 2 हार 258, नाशिक 161, कोल्हापूर 114, ठाणे 133, नगर 101, जळगाव 81 तर सांगलीतून 82 मुली बेपत्ता झाल्या आहेत.

( हेही वाचा: सोलापूरची जागा काँग्रेसची; मविआसोबत लवकरच चर्चा होईल, नाना पटोलेंचं मोठं वक्तव्य )

दिवसेंदिवस मुली आणि महिलांची बेपत्ता होण्याची संख्या वाढते हे चिंताजनक असल्याचं राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी म्हटलं आहे. 2020 पासून हरवलेल्या महिलांच्या बाबतीत महाराष्ट्र नंबर एकवर आहे. तर आम्ही राज्य महिला आयोगाच्यावतीनं वारंवार पाठपुरावा करत आहोत, असंही त्या म्हणाल्या. जानेवारी 2023 ते मार्च 2023 या तीन महिन्यांची आकडेवारी पाहता, राज्यातील 5,610 मुली बेपत्ता झाल्याचं स्पष्ट आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -