घरनवी मुंबईनवी मुंबईला घर घ्यायचंय? 65 हजारांपेक्षा जास्त घरांची निघणार लॉटरी; वाचा सविस्तर

नवी मुंबईला घर घ्यायचंय? 65 हजारांपेक्षा जास्त घरांची निघणार लॉटरी; वाचा सविस्तर

Subscribe

सिडको जवळपास 65 हजारांच्या घरांची सोडत काढणार असल्याचा अंदाज आहे. अत्यल्प उत्पन्न गटातील नागरिकांसाठी पंतप्रधान आवास योजना आणि मध्यम उत्पन्न व उच्च उत्पन्न गटासाठी सिडको महामंडळाने तयार केलेल्या घरांची लवकरच लॉटरी निघणार आहे.

आपलं स्वत: चं एक घर असावं अशी प्रत्येकाची इच्छा असते. आता हे स्वप्न लवकरच साकार हो म्हाडानंतर आता सीडको घरांची सोडत निघणार आहे. सिडको जवळपास 65 हजारांच्या घरांची सोडत काढणार असल्याचा अंदाज आहे. अत्यल्प उत्पन्न गटातील नागरिकांसाठी पंतप्रधान आवास योजना आणि मध्यम उत्पन्न व उच्च उत्पन्न गटासाठी सिडको महामंडळाने तयार केलेल्या घरांची लवकरच लॉटरी निघणार आहे. ( Want to buy a house in Navi Mumbai Lottery of more than 65 thousand houses Read in detail )

येत्या जून महिन्यानंतर वेगवेगळ्या गटांतील गृह प्रकल्पांची लॉटपी सिडकोतर्फे काढण्यात येणार असून त्याअंतर्गत तब्बल 65 हजार घरं उपलब्ध होतील, असा अंदाज आहे. लॉटरीसाठी सिडकोने नव्या सॉफ्टवेअरचे काम पूर्ण केलं आहे. जून महिन्यातील लॉटरीकरता त्याचा वापर करण्याचा विचार सिडको वर्तुळात केला जात आहे.

- Advertisement -

पहिल्या टप्प्यात तळोजा परिसरात शिर्के कंपनीतर्फे तयार करण्यात आलेली सुमारे 5 हजार घरांची लॉटरी जूनमध्ये काढण्याचे सिडकोच्या विचाराधीन आहे. त्यापाठोपाठ खारकोपर, कळंबोली, खारघर, जुईनगर आणि सानपाड्यातील घरांची कामं पूर्णत्वास आल्यास त्याचीही लॉटरी निघेल.

या कंपन्यांकडे गृह उभारण्याची जबाबदारी 

भाजप सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सिडकोतर्फे वर्षभरात एक लाख घरं निर्माण करण्याची घोषणा केली होती. आता याची अंमलबजावणी होत असल्याचं दिसून येत आहे. सिडकोतर्फे तळोजा, उलवे, खारकोपर, कळंबोली, सानपाडा, जुईनगर आदी परिसरात गृह प्रकल्प उभारण्याचे काम वेगात सुरु आहे. विशेष म्हणजे, सिडकोने पहिल्यांदाच घरांच्या निर्मितीची कामं रियल इस्टेट जगतातील नावाजलेल्या एल अॅण्ड टी शापूरजी इत्यादींसारख्या नामांकित कंपन्यांना दिली आहेत.

- Advertisement -

( हेही वाचा: खुशखबर! सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकीचा चौथा हप्ता ‘या’ महिन्यात मिळणार )

या भागातील काम अंतिम टप्प्यात

तळोजा, द्रोणागिरी, कळंबोली आणि घणसोलीमध्ये सात हजार 449 घरांची लॉटरी काढण्यात आली होती. त्यापैकी भाग्यवान विजेत्यांना घरांच्या वाटपाची प्रक्रिया सुरु आहे. मात्र, त्यासोबतच सध्या सिडकोतर्फे तळोजा, कळंबोली, खारकोपर, उलवे, जुईनगर, सानपाडा आदी भागांत तब्बल 65 हजारांपेक्षा जास्त घरांच्या गृहप्रकल्पांचे काम अंतिम टप्प्यात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -