घरक्रीडा'या' लीग क्रिकेटसाठी जेसन रॉय इंग्लंड बोर्डाचा करारावर मारणार लाथ?

‘या’ लीग क्रिकेटसाठी जेसन रॉय इंग्लंड बोर्डाचा करारावर मारणार लाथ?

Subscribe

इंग्लंडचा सलामीवीर जेसन रॉय युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेत होणाऱ्या मेजर लीग क्रिकेट स्पर्धेच्या पहिल्या हंगामात खेळण्यास उत्सुक आहे. यासाठी इंग्लंड क्रिकेट बोर्डाच्या केंद्रीय करारावर लाथ मारण्याच्या तयारीत असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.

इंग्लंडचा सलामीवीर जेसन रॉय युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेत होणाऱ्या मेजर लीग क्रिकेट स्पर्धेच्या पहिल्या हंगामात खेळण्यास उत्सुक आहे. यासाठी इंग्लंड क्रिकेट बोर्डाच्या केंद्रीय करारावर लाथ मारण्याच्या तयारीत असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. हा हंगाम 13 जुलैपासून 30 जुलैपर्यंत होणार आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्ड वार्षिक जवळपास 66,000 पाऊंड्स रूपये खेळाडूंना देते. इसीबी हे क्रिकेट जगतातील सर्वात जास्त रक्कम देणाऱ्या क्रिकेट संघटनांपैकी एक आहे. (Roy agrees termination of ECB incremental contract to play in MLC)

मिळालेल्या माहितीनुसार, इंग्लंडचा सलामीवीर जेसन रॉयनंतर रीसे टॉप्ले देखील जेसन रॉयच्या पावलावर पाऊल टाकण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र त्याचा हा निर्णय त्याच्या खांद्यावर झालेल्या शस्त्रक्रियेतून तो कसा सावरतो यावर अवलंबून आहे. दरम्यान, इसीबीने हॅरी ब्रुक, डेविड मलान, मॅथ्यू पॉट्स, जसन रॉय, टॉप्ले आणि डेव्हिड विली यांच्याशी देखील 2022 – 23 साठी हाच करार केला होता.

- Advertisement -

मेजर लीग क्रिकेट 13 जुलैलापासून

मेजर लीग क्रिकेट ही 13 जुलैलापासून टेक्सास येथे सुरू होणार आहे. या स्पर्धेत आयपीएल आणि ऑस्ट्रेलियातील फ्रेंचायजींचा समावेश आहे. रॉय हा एल ए नाईट रायडर्स संघाकडून खेळण्याची शख्यता आहे. मात्र यासाठी त्याला इसीबीचा करार सोडावा लागणार आहे. ही स्पर्धा आणि इंग्लंडची टी 20 ब्लास ही स्पर्धा क्लॅश होण्याची शक्यता आहे. जर मेजर लीग क्रिकेटचा विस्तार झाला तर त्याचा परिणाम भविष्यात इंग्लंडच्या द हंड्रेड स्पर्धेवर होणार आहे. त्यामुळे इंग्लंड क्रिकेट बोर्ड हे करारबद्ध खेळाडूंना ना हरकत प्रमाणपत्र देण्यास नकार देत आहे.

- Advertisement -

हेही वाचा – MS Dhoni : निवृत्तीच्या प्रश्नावरील धोनीचे उत्तर गुलदस्त्यात; म्हणाला, ‘तर मला…’

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -