घरमुंबईआयपीएल बेटिंग; अरबाज बरोबर आणखी सेलिब्रेटी गळाला लागणार

आयपीएल बेटिंग; अरबाज बरोबर आणखी सेलिब्रेटी गळाला लागणार

Subscribe

आयपीएल बेटिंग प्रकरणी चित्रपट अभिनेता अरबाज खानच्या चौकशीनंतर चित्रपट सृष्टीतील अन्य सात सेलिब्रिटींची नावे समोर आली आहेत. या माहितीच्या आधारावर आज ठाणे पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाकडून सात जणांपैकी दोघांना समन्स बजावण्यात आले. यात चित्रपट निर्माता पराग संघवी आणि समीर बुडा या दोघांना समावेश आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दोघांनाही उद्या सकाळी ठाणे पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाच्या कार्यालयात हजर रहावे लागणार आहे.

पराग संघवी हा अलुम्बरा एंटरटेनमेंट आणि लोटस फिल्म कंपनीच्या सीईओ पदावर कार्यरत आहे. संघवी याने सलमान खानचा पार्टनर, भूतनाथ रिटर्न, आणि अटॅक ऑफ २६/११ अशा चित्रपटांची निर्मिती केली आहे. समन्स बाजावण्यात आलेला समीर बुडा हा पोलीस खात्यातील माजी पोलीस उपनिरीक्षकाचा भाऊ आहे. त्याची स्वतःची सिक्युरिटी कंपनी आणि डिटेक्टिव्ह एजन्सी असल्याचे समोर आले आहे.

- Advertisement -

मागील ४ वर्षांपासून सुरु होती बेटिंग

अरबाज खानची चौकशी केल्यावर त्याने आयपीएल सामन्यांवर बेटिंग करत असल्याची कबुली दिली आहे. ज्यामध्ये आतापर्यंत तो २ कोटी ८० लाख रुपये हरला. मागील ४ वर्षांपासून अरबाज आयपीएलमध्ये बेटिंग करत होता. चित्रपट जगतातील काही नामवंत व्यक्तीही बेटिंग करत असल्याचे त्याने सांगितले. सोनू जालान हा बेटिंग करणाऱ्या नामवंत व्यक्तिंचे व्हिडिओ रेकॉर्ड करुन त्यांना या व्हिडिओच्या आधारावर ब्लॅकमेल करत होता. पोलिसांनी अद्याप अरबाजवर कोणताही गुन्हा दाखल केला नसला तरी त्याला चौकशीसाठी पुन्हा बोलावले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -